Wednesday, May 1, 2024
घरमानिनीReligiousगीता जयंतीला करावेत 'हे' उपाय श्री कृष्ण होतील प्रसन्न

गीता जयंतीला करावेत ‘हे’ उपाय श्री कृष्ण होतील प्रसन्न

Subscribe

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. असं म्हटलं जातं की, या दिवशी श्री कृष्णाने अर्जुनला गीतेचा उपदेश दिला होता. त्यामुळे या एकादशीला गीता जयंती म्हणून साजरे केले जाते. यंदा 22 डिसेंबर रोजी गीता जयंती साजरी केली जात आहे. या शुभ दिनी हिंदू धर्मात व्रत, पूजा देखील केली जाते.

गीता जयंतीला करा ‘हा’ उपाय

The Significance of Krishna as Arjuna's Charioteer | Mahabharat

- Advertisement -
  • पौराणिक मान्यतेनुसार, गीता जयंतीच्या दिवशी श्री कृष्णाची मनोभावे पूजा-आराधना केल्यास व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते. तसेच या दिवशी गीतेचे देखील आवर्जून पठण करावे.
  • गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर गीतेचा पाठ शक्य नसल्यास त्याचे श्रवण करावे. याने मनाला शांती मिळते.
  • तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर या दिवशी सकाळी लवकर उठून श्री कृष्णांची पूजा करावी.
  • या शुभ दिवशी आपल्या कुवतीनुसार गरीब आणि गरजूंना दान करावे. यामुळे पुण्य फळ प्राप्त होतात.
  • या दिवशी भगवान श्रीकृष्णाला तुळशीची माळ अर्पण करावी.
  • गीता जयंतीला “ओम नमो भगवते वासुदेवाय”, “क्लीं कृष्णाय नमः” किंवा श्री कृष्णाच्या महामंत्राचा जप करावा.

हेही वाचा :

‘या’ राशींसाठी मोती घालणं पडेल महागात

- Advertisment -

Manini