Thursday, May 16, 2024
घरमानिनीReligiousपरीक्षेत यश हवंय? मग बुधवारी करा 'हा' चमत्कारी उपाय

परीक्षेत यश हवंय? मग बुधवारी करा ‘हा’ चमत्कारी उपाय

Subscribe

हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार विविध देवी-देवता आणि ग्रहांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वारानुसार केलेले उपाय आणि नियम महत्वपूर्ण मानले जातात. जेणेकरुन त्या ग्रहांचे आणि देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. बुधवारचा दिवस गणपतीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी गणपतीची पूजा-आराधना केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवाय यादिवशी केलेले उपाय आपल्या कामात येणारे अडथळे दूर करण्यास मदत करतात.

बुधवारी करा ‘हा’ चमत्कारी उपाय

कौन लाया था गणेश जी के लिए हाथी का सिर |Ganesh Chaturthi Story| Ganesh Ji Ke Liye Hathi Ka Sir Kaun Laya Tha | ganesh chaturthi 2022 who brought head of elephantशैक्षणिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी

  • ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही त्यांनी बुधवारी श्री गणेशांची पूजा-आराधना करावी. या दिवशी ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
  • तसेच या दिवशी विद्यार्थ्यांनी श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण करावे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते.
  • बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. कारण या दिवशी हिरवा रंग परिधान केल्याने बुध ग्रह मजबूत होतो.
  • बुधवारी गरजू व्यक्तीला हिरवे मूग दान करावी आणि गायीला चारा खाऊ घालावा.

कर्ज फेडण्यासाठी

  • जर तुमच्यावर कर्ज असेल आणि ते लवकर फेडता येत नसेल तर बुधवारी दीड पाव मूग उकळून घ्या आणि त्यात्यात साखर आणि तूप मिसळून गायीला खाऊ घाला. हा उपाय सलग 7 बुधवार केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते.
  • बुधवारच्या दिवशी गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपतीला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच या दिवशी गणपतीला दुर्वांचा हार अर्पण करावा. यामुळे कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

हेही वाचा :

पूजेमध्ये धूप, अगरबत्ती लावण्यामागे धार्मिक महत्व काय?

- Advertisment -

Manini