Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2023 लाडक्या बाप्पासाठी मोदकांच्या पाककृती

लाडक्या बाप्पासाठी मोदकांच्या पाककृती

Subscribe

मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, विविध रंगांचा वापर करून केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.

Modak Recipe - Only 10 Minutes Quick & Easy Modak – Ganesh Chaturthi  Special Besan Modak - YouTube

- Advertisement -

उकडीचे मोदक
तांदळाची उकड तयार करून त्यात ओलं खोबरं व गूळ याचे सारण भरून मोदकाचा छान आकार देऊन वाफवावे.

केळ्याचे मोदक
सोललेली केळी, ओले खोबरे, दुध, गुळ घालून मिश्रण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यावे. त्या पेस्टमध्ये वेलची पावडर आणि रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हाताला थोडे तूप लावून त्याचे मोदक बनवावेत. मंद आचेवर (तेलात/तुपात) मोदक सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावेत.

- Advertisement -

तळणीचे मोदक
तळणीचे मोदक हे गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. यातील सारण हे ओल्या खोबऱ्याचे नसून सुक्या खोबऱ्याचे असते. ज्यामुळे हा मोदक छान चवीला रुचकर लागतो. तसेच तळणीचे मोदक विदर्भ भागात जास्त खाल्ला जातो.

तांदळाचे गुलकंदी मोदक
तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळा किंवा वाफवून घ्या.

How to make ukadiche modak - YouTube

चॉकलेटचे मोदक
खवा, खोबरं, दाणे बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा व एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून सर्व्ह करा.

उपवासाचे मोदक
गूळ आणि दाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिश घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.

खव्याचे मोदक
हा प्रकार अगदी कमी वेळात आणि बनवण्यास सोपा आहे. खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करावे.

गूळ कोहळ्याचे मोदक
हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातील. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.

पुरणाचे मोदक
पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेता येतात.

Get Your Hands On This Old-School Ukdiche Modak recipe

फ्रुट मोदक 
वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

मिक्स मेवा मोदक 
पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

काजु-मनुकांचे मोदक 
मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

तीळगुळाचे मोदक 
गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावेत किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावेत.

Make Lord Ganesha and your loved ones happy with these amazing modak recipes  | Food-wine News - The Indian Express

खोबरं मैद्याचे मोदक 
रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.

कॅरामलचे मोदक 
पनीर, खवा, काजू, किसमिश, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सर्व्ह करावा.

काजू कतलीचे मोदक 
काजू कतलीचे सारण घेऊन यामध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

फुटाण्यांचे मोदक 
फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे.

बेसनाचे मोदक 
बेसनाच्या लाडवाच्या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा व मध्ये एक एक काजू भरावा.

डिंकाच्या लाडवाचे मोदक 
डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

_______________________________________________________________________

हेही वाचा : श्रावणात बनवा व्हेजिटेबल लॉलीपॉप

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -