Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार देवघर कोणत्या दिशेला असायला हवे?

Vastu Tips :  वास्तू शास्त्रानुसार देवघर कोणत्या दिशेला असायला हवे?

वास्तू शास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यात घरातील स्वयंपाक घरापासून ते घरातील बाथरुमपर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष दिशा ठरवण्यात आली आहे. घर जर वास्तूनुसार योग्य असेल तर त्या घरातील व्यक्ती नेहमी आपल्या प्रत्येक कामात यश मिळवतात. त्यांना कधीही कोणत्या अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र, घरात वास्तूदोष असल्यास घरात खूप नकारात्मकता पसरते. ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला घरातील मंदिर नक्की कोणत्या दिशेला असावे याबाबत माहिती देणार आहोत.

या दिशेला ठेवा घरातील देवघर

 

 

 

वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये पूजेचे मंदिर ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही ईशान्य मानली जाते. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधली दिशा, घरामध्ये या दिशेला मंदिर ठेवणं उत्तम मानलं जातं. मात्र, तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात मंदिर ठेवणं शक्य नसल्यास तुम्ही ते घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेऊ शकता.

वास्तू शास्त्रात, पूर्व आणि उत्तर दिशेला शुभ दिशा मानले जाते. या दिशेला मंदिर असल्यास साधकाचे तोंड देखील पूर्व किंवा उत्तर दिशेला होतो. ज्यामुळे पूजा केल्याचे साधकाला पूर्ण फळ प्राप्त होते.

देवघर कधीही घरातील या ठिकाणी ठेऊ नका

देवघर कधीही स्वयंपाकघर किंवा बेडरूममध्ये ठेवू नका. मात्र, कमी जागेमुळे तुम्हाला जर स्वयंपाकघर किंवा बेडरूममध्ये देवघर ठेवावे लागत असल्यास तुम्ही ते काही उंचीवर ठेवा आणि त्याखाली एखादी लाकडी किंवा काचेची फळी लावा.


हेही वाचा :

Vastu Tips : तुळशीच्या सुकलेल्या पानांचे करा ‘हे’ उपाय अन् पहा चमत्कार

First Published on: May 10, 2023 5:21 PM
Exit mobile version