31 ऑगस्ट रोजी कधी कराल गणेश मूर्तीची स्थापना? जाणून घ्या शुभमुहूर्त

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

जाणून घ्या गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त


यावर्षी गणेशोत्सव 31 ऑगस्ट 2022 रोजी सुरू होणार आहे. तसेच या दिवशी बुधवार देखील असणार आहे. त्यामुळे गणेश आगमनासाठी हा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. या दिवशी गणेश मूर्ती घरी आणण्याची शुभ करण्याचा मुहूर्त
मंगळवार, 30 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 23 मिनिटांपासून ते बुधवार, 31 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे.

9 सप्टेंबर रोजी होईल गणपती विसर्जन
31 ऑगस्ट रोजी गणपतीची स्थापना झाल्यानंतर १० दिवसांनंतर 9 सप्टेंबर रोजी गणपतीचे विसर्जन केले जाईल.


हेही वाचा :गणपती बाप्पा मोरया..! वेध स्वागताचा अन् जल्लोषाचा…

First Published on: August 19, 2022 5:01 PM
Exit mobile version