गणपती बाप्पा मोरया..! वेध स्वागताचा अन् जल्लोषाचा…

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात श्रीगणेशोत्सव साजरा करण्यावर खूप कडक बंधने घालण्यात आल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेश भक्त जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आहेत. राज्यातील नवीन शिंदे सरकारने तर गणेश मूर्तींवरील बंधने हटवली आहेत. त्यामुळे यंदा गणेश मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात असल्याचं पाहायला मिळत आहे.