Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousमिथुन राशीच्या व्यक्तींनी 2024 मध्ये कोणत्या देवाची उपासना करावी?

मिथुन राशीच्या व्यक्तींनी 2024 मध्ये कोणत्या देवाची उपासना करावी?

Subscribe

ज्योतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव, गुण तसेच राशीचा ग्रह स्वामी सांगितला जातो. ज्योतिष शास्त्रातील 12 राशींपैकी तिसरी मिथुन रास मानली जाते. आज आम्ही तुम्हाला मिथुन राशीसाठी 2024 वर्ष कसे असेल तसेच या वर्षात त्यांनी कोणत्या देवाची उपासना करावी हे सांगणार आहोत.

मिथुन राशीसाठी 2024 वर्ष

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2024 वर्षाची सुरूवात कुटुंबात तणाव आणि कलह निर्माण करणारी असेल. कामात अनेक अडथळे येतील पण अशावेळी निराश होऊ नका. यंदा नोकरीत प्रमोशन देखील मिळू शकते. स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांसाठी हा काळा अनुकूल असेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. वर्षाच्या सुरुवातीला प्रवास, धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

- Advertisement -

गणपतीची करा उपासना

DIY Ganpati Decor Ideas For Your Home - Berger Blog

  • मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असल्यामुळे या व्यक्तींनी नेहमी श्री गणेश आणि श्री विष्णूंची भक्ती करावी.
  • प्रत्येक बुधवारी श्री गणेश किंवा श्री विष्णूंच्या मंदिरात जावे. यावेळी प्रसाद म्हणून केळी देखील घेऊन जावी.
  • दररोज श्री गणेश अर्थवशीर्ष आणि श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. यामुळे या दोन्ही देवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील.
  • बुधवारी लाल हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करावे.
  • बुधवारी गायीला चारा खाऊ घालावा.

हेही वाचा : वृषभ राशीच्या व्यक्तींनी 2024 मध्ये कोणत्या देवाची उपासना करावी?

- Advertisment -

Manini