Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousवृषभ राशीच्या व्यक्तींनी 2024 मध्ये कोणत्या देवाची उपासना करावी?

वृषभ राशीच्या व्यक्तींनी 2024 मध्ये कोणत्या देवाची उपासना करावी?

Subscribe

ज्योतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव, गुण तसेच राशीचा ग्रह स्वामी सांगितला जातो. ज्योतिष शास्त्रातील 12 राशींपैकी दुसरी वृषभ रास मानली जाते. आज आम्ही तुम्हाला वृषभ राशीसाठी 2024 वर्ष कसे असेल तसेच या वर्षात त्यांनी कोणत्या देवाची उपासना करावी हे सांगणार आहोत.

वृषभ राशीसाठी 2024 वर्ष

वृषभ राशीच्या व्यक्तींना या वर्षात अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. या वर्षात करिअरमध्ये मेहनतीच्या जोरावर यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. परंतु यावर्षात खर्च भरपूर वाढतील. वैवाहिक जीवनात गैरसमज झाल्यास तणावपूर्व स्थिती निर्माण होईल. मात्र, वर्षाच्या शेवट्या टप्प्यात हे वाद मिटतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

- Advertisement -

वृषभ राशीच्या व्यक्तींना या वर्षात उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. या वर्षात नवे संपर्क वाढतील. समाजात मान-सन्मान मिळेल. केवळ रागावर नियंत्रण ठेवा.

देवीची करा उपासना

Lakshmi Idol/Murti Making for Diwali |Idol Decoration| Festival Diwali  2021| - YouTube

  • 2024 सुखकर जावे यासाठी वृषभ व्यक्तींनी देवी लक्ष्मीची किंवा देवी दुर्गेची उपासना करावी.
  • प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात जावे. यावेळी मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचे फुल आणि सफेद मिठाई प्रसाद म्हणून घेऊन जावी.
  • दररोज श्री सुक्ताचे आणि दुर्गा चालिसा वाचावी. यामुळे देवीचा आर्शीवाद तुम्हाला प्राप्त होईल.
  • शुक्रवारी दही, ताक, लोणचं असे आंबट पदार्थ आणि मांसाहार खाऊ नये. या दिवशी केवळ सात्विक आहार घ्यावा.

हेही वाचा : 2024 मध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवाची उपासना करावी?

- Advertisment -

Manini