घरक्राइमDelhi : ओळख पटत नव्हती, एआयची मदत घेत पोलिसांनी उघडले मृतदेहाचे डोळे...

Delhi : ओळख पटत नव्हती, एआयची मदत घेत पोलिसांनी उघडले मृतदेहाचे डोळे अन्…; काय आहे प्रकरण?

Subscribe

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Ai) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून याआधी अनेक गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. मात्र आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत आरोपीला अटक केली आहे. अनेकदा ओळखीसाठी वृत्तपत्रांमध्ये मृत व्यक्तीचे फोटो प्रसिद्ध केले जातात, मात्र त्यात चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मृतदेहाचा चेहरा आधी सामान्य छायाचित्राप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खुनाचा छडा लावला आहे. (Delhi There was no identification police took help from AIIMS and uncovered the dead body eyes and bloody eyes)

हेही वाचा – Jitendra Awhad : अजितदादा आधी शरद पवारांचे ऐकत नव्हते अन् आता पंतप्रधानांचे; आव्हाडांचा निशाणा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 10 जानेवारीला दिल्ली पोलिसांना गीता कॉलनी फ्लायओव्हरखाली एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर, गळा दाबून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. परंतु, मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र सापडले नाही, त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात पोलिसांनी यश आले नाही. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकऱ्याने अत्यंत हुशारीने गीता कॉलनीच्या उड्डाणपुलाखालील परिसर निवडला होता. त्यामुळे पोलिसांना मृतदेहची ओळख पटवण्यात सर्वात मोठी अडचण येत होती. याशिवाय मृतदेहाचा फोटो पाहून कोणीही सहज ओळखू शकेल, अशा स्थितीत त्याचा चेहरा नव्हता. त्यामुळे उत्तर दिल्ली पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि ओळख पटवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली.

अखेर मृतदेहाची ओळख पटली

एआयच्या मदतीने पोलिसांनी मृतदेहाचा चेहरा अशा प्रकारे दाखवला की त्याचे डोळे उघडे दिसतील. यानंतर पोलिसांनी त्याचे फोटो काढले आणि पोस्टर बनवून दिल्लीच्या विविध भागात लावले. तसेच वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्टर्स पाठवण्यात आले. पोलिसांनी एकूण पाचशे पोस्टर्स छापले होते. पोलिसांनी दिल्लीच्या बाहेरील छावला भागात मृतदेहाचे पोस्टर्स लावले होते. छावला पोलीस ठाण्याबाहेरील पोस्टरवरून ओळख पटली आणि दिल्ली पोलिसांना फोन आला. यावेळी फोन करणाऱ्याने पोलिसांनी सांगितले की, हा फोटो त्याचा मोठा भाऊ हितेंद्रचा आहे. एकदा ओळख पटल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हितेंद्रच्या प्रोफाइलची तपासणी केली आणि त्याच्या आसपासच्या लोकांची चौकशी केली, जेणेकरून तपास पुढे जाऊ शकेल.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा युक्तिवाद

चार आरोपींनी अटक

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना समजले की, हितेंद्रचे तीन तरुणांशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी भांडण झाले होते, तिथे जाऊन चौकशी केली. यावेळी तिन्ही तरुणांनी हितेंद्रचा गळा आवळून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे समोर आले. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी एका महिलेनेही त्यांना मदत केल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -