हिंदू धर्मात मंदिरात जाणं शुभ मानलं जातं. मंदिरात जाऊन मनोभावे देवाचे दर्शन घेतल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मकता येते. शिवाय मन प्रसन्न होते. परंतु आपण नेहमी पाहिले असेल की, कोणत्याही मंदिरात जाण्यासाठी केवळ सकाळ आणि संध्याकाळची वेळचं योग्य मानली जाते. दुपारी कधीही कोणी मंदिरात जात नाही तसेच अनेकदा दुपारी मंदिरं बंद देखील असतात.
दुपारी मंदिरात का जाऊ नये?
दुपारी मंदिरात न जाण्यामागे शास्त्रामध्ये काही कारणांचे वर्णन करण्यात आले आहे. शास्त्रानुसार, दुपारच्या वेळी आपले शरीर आळशी असते. अशा स्थितीत कधीही आपण देवाचे दर्शन घेण्यासाठी मन एकाग्र करु शकत नाही.
आणखी एका कारणानुसार अनेकदा दुपारच्या वेळी सर्व मंदिरे बंद असतात. कारण दुपारच्या वेळी मंदिरातील देवी-देवता विश्रांत घेत असतात. ज्यामुळे मंदिर काही वेळ बंद ठेवले जाते.
मंदिरात जाण्यासाठी कोणती वेळ उत्तम?
शास्त्रानुसार, मंदिरात जाण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी ही वेळ उत्तम मानली जाते. या वेळी आपले मन प्रसन्न असते. तसेच या वेळच्या वातावरणात शांतता आणि प्रसन्नता असते. ही वेळ आपल्याला देवाचे दर्शन, मंत्र जप, स्तोत्र पठण करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.
हेही वाचा :