घरताज्या घडामोडीAaditya Thackeray : भ्रष्ट माजी आयुक्त मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव; आदित्य ठाकरेंची...

Aaditya Thackeray : भ्रष्ट माजी आयुक्त मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव; आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका

Subscribe

इकबाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र इकबाल सिंह चहल यांच्या या नियुक्तीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

मुंबई : सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली करण्याचे निर्देश दिले होतो. त्यानुसार, त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (20 मार्च) नव्या महापालिका आयुक्तांची नियक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, इकबाल सिंह चहल हे बदलीनंतर वेटींगवर होते. अखेर आज इकबाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र इकबाल सिंह चहल यांच्या या नियुक्तीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. (aaditya thackeray slams cm eknath shinde and former bmc commissioner iqbal singh chahal)

इकबाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इकबाल सिंह चहल यांच्यावर एक्सवरून (ट्विटर) निशाणा साधला. “मी २ दिवसांपूर्वी भाकित केलं होतं अगदी तसंच घडलंय. मुंबई महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्र्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्त झाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना (CM – contractor Minister) मदत करण्यासाठी या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झाली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेलं हे बक्षिस आहे”, असे ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने दट्ट्यानंतर राज्य शासनाने काल, मंगळवारी सायंकाळी अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त इकबालसिंह चहल यांचा समावेश नाही. यावरूनही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली होती. एक्सवर ट्वीट करत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता.

आदित्य ठाकरेंचे ट्वीट

“भाजपापुरस्कृत खोके सत्ताधाऱ्यांचे मुंबई पालिकेच्या भ्रष्ट आयुक्तांवरचे प्रेम अचंबित करणारे आहे. निवडणूक आयोगाने त्यांची हकालपट्टी केली असली तरी ‘मिंधे’ सरकारने त्यांची बदली करण्यास नकार दिला. आता मुख्यमंत्री कार्यालयात बदली होईल की त्यांना दिल्लीला पाठवले जाईल? असा सवाल करतानाच गेल्या दोन वर्षांत मुंबईची ज्या प्रकारे लूट झाली आहे, ती पाहता भाजपा-मिंधे सरकारने नक्कीच त्यांना बढती देण्याची शिफारस केली असावी”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता.

- Advertisement -


हेही वाचा – Aaditya Thackeray : भ्रष्ट आयुक्तांवरचे प्रेम अचंबित करणारे, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -