Sunday, May 5, 2024
घरमानिनीFashionस्किन ग्लोइंगसाठी प्या या फळाचा ज्यूस

स्किन ग्लोइंगसाठी प्या या फळाचा ज्यूस

Subscribe

निरोगी आणि चमकदार त्वचा प्रत्यक्ष महिलेला हवी असते. यासाठी महिला स्किनकेअरच्या अनेक टिप्स फॉलो करत असते. जसे की, फेसपॅक, स्क्रब आणि बरेच काही… पण, इतके उपाय करूनही चेहऱ्यची चमक निघून जाते. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता किंवा काही पदार्थ खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला यावरील एक साधा सोपा उपाय सांगणार आहोत. तुम्हाला केवळ त्या फळाचा ज्यूस प्यायचा आहे. चेहरा गुलाबी आणि चमकदार होण्यासाठी डाळिंब आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस पिणे उपयुक्त ठरू शकते. याव्यतिरिक्त तुम्ही गाजराचा ज्यूसही प्यायला हवा.

डाळिंब आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस (Pomegranate and strawberry juice)

डाळिंब आणि स्ट्रॉबेरी दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे कॉलेजन उत्पादनात महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्याच बरोबर अँटीऑक्सीडेंट असतात ज्याने त्वचेची चमक वाढण्यास मदत होते. डाळिंब आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस प्यायल्याने शरीरालाही फायदा होतो. डाळिंब आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस प्यायल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. परिणामी, त्वचेत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो आणि त्वचेवर नैसर्गिक ओलावा टिकून रहाते.

- Advertisement -

डाळिंब आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनविण्यासाठी साहित्य आणि पद्धत जाणून घेऊयात,

साहित्य (Material)

  • दोन डाळिंब
  • 5 ते 7 ताजी स्ट्रॉबेरी
  • 1 चमचा मध
  • सैन्धव मीठ
  • जिरे पूड
  • अर्ध्या लिंबाचा रस

पद्धत (Method)

  • डाळिंबाचे दाणे सोलून आणि स्ट्रॉबेरीही धुवून घ्या.
  • डाळिंब आणि स्ट्रॉबेरीची ग्राईन्डरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार पेस्टमधून गाळून ज्यूस काढून घ्या.
  • तयार ज्यूसमध्ये लिंबाचा रस, मध, सैन्धव मीठ आणि जिरे पूड त्यात मिक्स करा.
  • तयार ज्यूसमध्ये आईसक्युब टाकून ज्युसचा आस्वाद घ्या.

गाजराचा ज्यूस (Carrot juice)

चमकदार त्वचेसाठी गाजर खाणे फायद्याचे ठरते. गाजर त्वचेला आतून चमकदार बनविण्यासाठी तसेच इतर समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. पिण्याव्यतिरिक्त तुम्ही गाजराचा रस चेहऱ्यावरही लावू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा कोणता रेगुलर फेसपॅक लावत असाल तर त्यात गाजराचा रस मिक्स करून ते तुम्ही लावू शकता.

- Advertisement -

साहित्य (Material)

  • 3 ते 4 गाजर
  • एक चमचा सैन्धव मीठ

पद्धत (Method)

  • गाजराचे बारीक तुकडे करून घ्या.
  • तयार गाजराचे बारीक तुकडे ग्राईन्डरमध्ये बारीक करून घ्या.
  • तयार ज्यूसमध्ये सैन्धव मीठ टाकून ते सर्व्ह करा.
  • गाजराचा ज्यूस तुम्ही जर चेहऱ्यावर लावणार असाल तर तो कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा.
  • काही वेळ गाजराचा ज्यूस तचेहऱ्यावर लावून ठेवा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

 


हेही वाचा : उन्हाळ्यात तेलकट केसांमुळे त्रस्त आहात?

 

 

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini