नवरात्रीच्या नवदुर्गा मूर्ती कामांना वेग; सोन्याने मढवलेल्या मूर्तीना मागणी

नवरात्रीच्या नवदुर्गा मूर्ती कामांना वेग; सोन्याने मढवलेल्या मूर्तीना मागणी

नवरात्रीच्या नवदुर्गा मूर्ती कामांना वेग; सोन्याने मढवलेल्या मूर्तीना मागणी

अश्विन शुध्द प्रतिपदा अर्थात नवरात्र उत्सवाची सुरवात घटस्थापना ७ ऑक्टोबरपासून होत आसल्याने पेण तालुक्यातील मूर्ती कारखान्यांमध्ये विविध आकार आणि रुपातील मूर्तींवर रंगाचा अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत.
पितृपक्ष समाप्तीनंतर अश्विन शुध्द प्रतिपदेला अर्थात घटस्थापनेला प्रारंभ होत आहे. गणेश उत्सवाप्रमाणे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधता बाळगून नवरात्र उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने संमती दिल्याने मंडळांनी या उत्सवाची लगबग सुरू केली आहे. प्रसंगी दांडिया, गरबा, भोंडला, वेशभुषा स्पर्धा या कार्यक्रमांव्दारे मोठ्या प्रमाणात गर्दी खेचण्यासाठी सार्वजनिक नवरात्र मंडळे सरसावलीआहेत. मात्र संकट सरलेले नाही, हे लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी सामाजिक कार्यक्रम घेण्याची मानसिकता मंडळांची आहे.

मंडळाची मुर्ती जेवढी आकर्षक तेवढेच उत्सवाचे स्वरुप मोठे मानले जाते. कोरोना कमी झाला असला तरी गर्दीने तो वाढू शकतो, हे लक्षात घेऊन मर्यादित उंचीच्या मूर्ती बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने व शासनाचे निर्बध असल्याने मुर्तीची उंची मर्यादित असल्याने व कार्यक्रमावर निर्बध असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याने बहुतांश मंडळानी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या मूर्तीवर निर्बध असल्याने साधारणपणे तीन ते चार फूट उंचीच्या देवीच्या मूर्तींची मागणी होते आहे. मूर्तीकारांनी वाघ, सिहांवर, उभ्या त्याच प्रमाणे महिषासुरमर्दीनी, चंडीका, अंबिका, एकविरा, कोल्हापूरची अंबाबाई, माहुर गडावरची रेणुका, तुलजापुरची भवानी, नाशिकची सप्तश्रुगी, सरस्वती, लक्ष्मी माता या रुपातल्या मूर्ती तयार केल्या आहेत.

अंलकारिक ज्वेलरीचा साज असलेल्या व कापडी साडीच्या मूर्तींची मागणी आहे.मोठ्या मुर्तीवर बंधने असल्याने नवरात्र उत्सवासाठी ज्वेलरीचा साज व कापडी साडी आसलेल्या तीन ते चार फुटाच्या देवीच्या मूर्तींना विशेष मागणी आहे.
– शांताराम पाटीलः मूर्तिकार, पेण


हे ही वाचा – Tata sons win air india bid : एअर इंडियासाठीची बोली टाटा सन्सने जिंकली


 

First Published on: October 1, 2021 1:16 PM
Exit mobile version