मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा, एकनाथ शिंदेंविरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल

मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा, एकनाथ शिंदेंविरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल

मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा केली होती. याविरोधात आता ठाणे सत्र न्यायालयात (Thane Court) तक्रार दाखल झाली आहे. सोमवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. कायद्यानुसार, सरकारी कार्यालयात धार्मिक पूजा करणं घटनाविरोधी आहे. महाराष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राज्य असून संविधानिक ठिकाणी अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे याचिकाकर्ते धनाजी सुरवसे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – मुंबई विमानतळाजवळील 48 इमारतींवर मुंबई उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश, नेमकं कारण काय?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारताना मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा केली होती. हे प्रकरण राज्यापालांकडेही गेलं होतं. राज्यपालांना एक निवदेन लिहून याप्रकरणी दखल घेण्याची मागणी केली होती. सत्यनारायण करणे घटनेच्या विरोधी असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत असंही या निवदेनात म्हटलं होतं. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या सत्यनारायणाची पूजा थेट आता ठाणे न्यायालयात पोहोचली आहे. धनाजी सुरवसे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडतीत दिग्गजांना दणका, ६३ प्रभाग ओबीसी आरक्षित

एकीकडे उद्या एकनाथ शिंदे यांच्या या कृतीवर उद्या सुनावणी होणार आहे. तर, दुसरीकडे १ ऑगस्ट रोजी १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दोन्ही न्यायालयात काय निकाल लागतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, ८ ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांना शिवसेनेच्या दाव्याबाबत कागदपत्रे सादर करायची आहेत. त्यामुळेच १ ऑगस्टला काय निकाल लागते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

First Published on: July 29, 2022 5:14 PM
Exit mobile version