Corona Live Update: गेल्या २४ तासांत मुंबईत १,२६९ कोरोनाचे नवे रुग्ण

Corona Live Update: गेल्या २४ तासांत मुंबईत १,२६९ कोरोनाचे नवे रुग्ण

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट


जगातील कोरोना कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५ लाख पार झाला आहे. तर ४ लाख ५६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४३ लाखांहून जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरुवारी राज्यात तब्बल ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ इतका झाला आहे. यापैकी ५३ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असं असलं, तरी गुरुवारी दिवसभरात राज्यात १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ हजार ७५१ च्या घरात पोहोचला आहे. सविस्तर वाचा 
First Published on: June 19, 2020 1:12 PM
Exit mobile version