घरताज्या घडामोडीकोरोनामुळे यंदा राम कदम यांची प्रसिद्ध दहीहंडी रद्द

कोरोनामुळे यंदा राम कदम यांची प्रसिद्ध दहीहंडी रद्द

Subscribe

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, मुंबईमध्ये तर दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यातच आता दहीहंडी सारखा उत्सव अवघ्या काही महिन्यावर आला असतानाच या उत्सवावर कोरोनाचे सावट दिसत आहे. याच कोरोनाच्या संकटामुळे भाजप आमदार राम कदम यांनी त्यांची घाटकोपर येथील दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ठाण्यामध्ये काही मोठ्या दहीहंड्या आयोजित केल्या जातात. त्यामध्ये राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीचा देखील समावेश आहे. त्यातच या दहीहंडीची किंमत देखील खूप मोठी असते. तसेच या दहीहंडीला बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील हजेरी लावत असताना त्यामुळे बऱ्याच गोविंदाच्या नजरा राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीकडे लागलेल्या असतात. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठया प्रमाणात मुंबईकर देखील सेलिब्रिटींना पाहण्यासाठी येत असतात मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता घाटकोपरला होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे, असे राम कदम यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

२०१८ ची दहीहंडी ठरली वादग्रस्त 

दरम्यान २०१८ मध्ये दहीहंडी उत्सवाच्या गर्दीसमोर राम कदम यांनी जोशात येऊन वादग्रस्त वक्तव्य केले होते. जोशातच त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला. गर्दीसमोर कोणतेही काम असल्यास आपल्याला संपर्क साधू शकता असे सांगत राम कदम यांनी आपला मोबाईल क्रमांक जाहीर करून टाकला होता. शिवाय, तरुणांना सल्ला देताना त्यांचे भान सुटले होते. तरुणांना कशी मदत करणार हे सांगताना कदम म्हणाले की, ‘एखाद्या तरुणीला प्रप्रोज केले आणि ती नाही म्हणतेय, प्लीज मदत करा. मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचे. तुमचे आई-वडील म्हणाले, साहेब ही मुलगी पसंत आहे तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार…’ या नंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -