Corona Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ५८७ नवे रुग्ण, ३५ जण मृत्युमुखी!

Corona Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ५८७ नवे रुग्ण, ३५ जण मृत्युमुखी!

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

गेल्या २४ तासांत मुंबईत ५८७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३७ हजार ६७८वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ४७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ११ हजार ९६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ७ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख ३ हजार ८२३वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २२ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेलचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ख्रिस गेले उसेन बोल्टच्या पार्टीत उपस्थित होता. या पार्टीनंतर उसेन बोल्टचा अहवा पॉझिटिव्ह आला होता.


सध्या देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २२.२ टक्के Active रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट हा ७५ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.


सोमवारपासून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वैद्यकीय स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलने दिली आहे.


गेल्या २४ तासात ३५१ पोलीस पॉझिटिव्ह; ३ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासात ३५१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. (सविस्तर वाचा)


गोंदिया जि.प.मुख्यालय सोमवारपर्यंत बंद

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पुढील खबरदारीचे उपाययोजना करण्यासाठी व इमारतीच्या निर्जतुंकीकरणासाठी येत्या सोमवारपर्यंत प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालये अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खेवले यांनी आज काढले आहेत.


शिवसेना खासदार संजय मंडलिकांना कोरोनाची लागण

कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय मंडलिक यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. यापूर्वी कोल्हापुरातील तीन आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती. (सविस्तर वाचा)


भारतातील कोरोना रुग्णांनी ३१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी ६० हजार ९७५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या २४ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांत ६० हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळल्याने देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा ३१ लाख ६७ हजार ३२४ पर्यंत पोहोचला आहे तर सध्या ७ लाख ४ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. (सविस्तर वाचा)


नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१२ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाख ९३ हजार ३९८वर पोहोचला असून आतापर्यंत २२ हजार ४६५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच आज १४ हजार २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ५ लाख २ हजार ४९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.४७% एवढे झाले आहे.

First Published on: August 25, 2020 9:08 PM
Exit mobile version