Corona Live Update: PM Modi २७ जुलैला मुंबईतील आयसीएआरच्या लॅबचे उद्घाटन करणार

Corona Live Update: PM Modi २७ जुलैला मुंबईतील आयसीएआरच्या लॅबचे उद्घाटन करणार

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नोएड, कलकत्ता आणि मुंबई येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) तीन नवीन हाय-थ्रुपुट लॅबचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, योगी आदित्यनाथ आणि ममता बॅनर्जी उपस्थित राहतील.
मुंबईत आज १ हजार ६२ कोरोनाबाधितांचा वाढ झाली असून ५४ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ६ हजार ८९१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५ हजार ९८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 
महाराष्ट्रात आज ९ हजार ६१५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २७८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५७ हजार ११७वर पोहोचली असून मृतांची संख्या १३ हजार १३२ झाली आहे. सविस्तर वाचा 
धारावीत आज ६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ५१९वर पोहोचला आहे. यापैकी २ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
ठाणे शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज ठाणे शहरात आज २८५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज ५०३ रुग्ण बरे झाले असून ठाणे शहरात एकूण १० हजार ५२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रिकव्हरी रेट ६१ टक्के आहे. सध्या शहरात ६ हजार ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून शहरातील मृतांचा आकडा ५७१वर पोहोचला आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३०५ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिका जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार २७४वर पोहोचला आहे. आतापर्यंत ८ हजार १४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई सेंट्रल जवळचे नवजीवन सोसायटीत ३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण कॉम्प्लेक्स १४ दिवसांसाठी सीलबंद करण्यात आले आहे.
राज्यासह नागपूर शहरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौर आणि आयुक्तांचे एक मत झाले आहे. लॉकडाऊनबाबत महापौरांनी बैठक बोलावलेली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र असून कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील ४ दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असेही निश्चित करण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)

१ ऑगस्टपासून राज्यात अनलॉक-२; मुख्यमंत्र्यांचे संकेत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे आता पुढे काय असा सवाल सर्वांना पडला आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक-२ चे संकेत दिले आहेत. ३१ जुलैनंतर निर्बंध शिथिल केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केले जातील असं सांगितलं. (सविस्तर वाचा)
देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४९,३१० नवे रुग्ण देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. देशात गेल्या २४ तासांत जी वाढ झाली आहे ती धडकी भरवणारी आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली असून देशात गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांच्या संख्येने १२ लाखांचा टप्पा पार केला आहे. तसेच २४ तासांत सर्वाधिक ७४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ८७ हजार ९४५ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ३० हजार ६०१ मृत्यू झाला आहे. तसेच ८ लाख १७ हजार २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४ लाख ४० हजार १३५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. (सविस्तर वाचा)
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६ हजार ४८४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.९ % एवढे झाले आहे.
First Published on: July 24, 2020 10:32 PM
Exit mobile version