घरताज्या घडामोडीनागपूरमध्ये दोन दिवसाचा जनता कर्फ्यू; संघर्षानंतर महापौर-आयुक्त एकत्र

नागपूरमध्ये दोन दिवसाचा जनता कर्फ्यू; संघर्षानंतर महापौर-आयुक्त एकत्र

Subscribe

नागपूरमध्ये दोन दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.

राज्यासह नागपूर शहरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौर आणि आयुक्तांचे एक मत झाले आहे. लॉकडाऊनबाबत महापौरांनी बैठक बोलावलेली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र असून कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील ४ दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असेही निश्चित करण्यात आले आहे.

काय म्हणाले महापौर संदीप जोशी?

महापौर आणि आयुक्तांनी आज लॉकडाऊन संदर्भात बैठक घेतली या बैठकीत सर्व जनप्रतिनिधींचे मत आम्ही जाणून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊन केले पाहिजे यासाठी कुणाचाही आग्रह नाही. पण, नियम पाळले जात नाहीत. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे २५ जुलै आणि २६ जुलै रोजी नागपुरात जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल. त्याचप्रमाणे २७ जुलै ते ३० जुलै या हे ४ दिवसांमध्ये नागपुरात लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरुन लोकांना आवाहन करणार आहेत’, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकानं बंद

अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकाने दोन दिवस बंद ठेवावीत. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये. नागरिकांनी नियम पाळले, तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनची वेळ येईल. तेव्हा कर्फ्यू देखील असेल. लोकांनी किमान आपल्या जीवासाठी तरी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.


हेही वाचा – आजीच्या टॅलेंटचं पुण्याच्या आयुक्तांनी केलं कौतुक…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -