यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे माथेरानमधील घोड्याचा मृत्यू

यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे माथेरानमधील घोड्याचा मृत्यू

माथेरानमधील घोड्याच्या मृत्यूमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला ;  यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत

माथेरानच्या आतल्या भागात वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे येथील लाल रस्त्यावर घोड्यांच्या टापांंच्या आवाजासह घोडेस्वार होऊन वेगळी गंमत अनुभवून पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असतो. याच माथेरानमधील अर्धवट कापलेल्या वीज खांबावर पडल्याने दुखापत झालेल्या घोड्याचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना घोड्याची सैर घडवून आणून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर अनेकांची कुटूंब आपली पोट भरत असतात. या घोड्यावर अवलंबून असलेल्या कोकळे कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. गावात सर्वत्र भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्यामुळे नगरपरिषदेच्या माध्यमातून जुने विजेचे खांब काढून टाकण्यात आले आहेत. परंतु हे वीज खांब पूर्णपणे काढण्यात आले असून एक फूट खांब तसेच राहिले आहेत. तिथे रस्त्याच्या बाजूला विजेचे खांब अर्धवट स्थितीत कापले होते. त्यावर पडून घोड्याच्या जांघेत मुका मार लागला होता. जवळपास चार ते पाच हजार रुपयांची इंजेक्शनसुध्दा घोड्याला देण्यात आली होती. परंतु यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे शनिवारी १४ ऑगस्टला मुक्या जीवाला आपला गमवावा लागला आहे.

माथेरानमधील उदरनिर्वाहाचा आधार 

नुकतेच माथेरान अनलॉक झाल्याने व्यवसायाची गाडी हळूहळू रुळावर येत होती. थोड्या फार प्रमाणात व्यवसाय होत असतानाच कोकळे यांच्या घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कोकळे कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा आधार गेला आहे. माथेरान हे अद्भुत निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. वाहनांना प्रवेश नसल्याने जिथे वाहनतळ आहे त्या दस्तुरीपासून माथेरानचा मुख्य बाजार तीन किलोमीटरवर आहे. ११ किलोमीटरवर असलेल्या नेरळपासून एक फुलराणी (नॅरो गेज रुळांवर धावणारी गाडी) माथेरानपर्यंत धावत असे. मात्र दोनदा ही गाडी रुळांवरून घसरली आणि २०१६ च्या मेपासून ती थांबवण्यात आली. त्यामुळे दस्तुरीपासून तुम्हाला माथेरानला एक तर चालत जावं लागतं किंवा हातरिक्षांमध्ये बसून जावे लागते किंवा घोडा करावा लागतो. म्हणूनच इथे हा घोड्यांचा, घोडेवाल्यांचा, रिक्षांचा आणि हमालांचा ताफा कायम सज्ज असतो.


हेही वाचा – पेणमधील गणपती बाप्पाच्या मूर्तींवर अखेरचा हात


 

First Published on: August 17, 2021 7:39 PM
Exit mobile version