नवरा जेलमध्ये असताना बायकोने साधली दिराशी जवळीक, संधी पाहून नवऱ्याने काढला काटा

नवरा जेलमध्ये असताना बायकोने साधली दिराशी जवळीक, संधी पाहून नवऱ्याने काढला काटा

नवरा जेलमध्ये असताना बायकोने साधली दिराशी जवळीक, संधी पाहून नवऱ्याने काढला काटा

उत्तर प्रदेशमधील चंदौली पोलिसांनी २ महिन्यांपासून झालेल्या तरुणाच्या खळबळजनक हत्येचे गूढ सोडवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. तर या हत्येचा एक आरोपी पहिल्यापासूनच पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीतून हत्येचे गूढ समोर आले आहे.

दरम्यान २ महिन्यांपूर्वी २८ ऑगस्टला चंदौली कोतवाली येथील धुरी कोट गावामधील राकेश रोशन नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळला. ज्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस याप्रकरणाचा तपास करत होते पण त्याच्या हाती काही सुगावा लागत नव्हता. शेवटी हत्येच्या मागचा साथीदार सापडला. यादरम्यान २९ ऑक्टोबरला पोलिसांनी आशुतोष यादव नावाच्या आरोपीला अटक केले. पोलिसांच्या चौकशीत आशुतोष यादवने यापूर्वी केलेल्या कारनाम्यांची कबुली दिली. हे ऐकूण पोलीस हैराण झाले होते. तसेच पोलिसांना आशुतोषने हत्येप्रकरणी सांगितले की, ‘२ महिन्यांपूर्वी राकेश रोशनच्या हत्येत तो सामिल होता आणि राकेशची हत्या त्याच्या छोट्या भावाने मुकेश यादवने केली आहे.’ मग पोलिसांनी आरोपी आशुतोष यादवने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुकेश यादवला ताब्यात घेतले. जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा या हत्येमागेच कारण ऐकूण पोलीस हैराण झाले.

मुकेशच्या पत्नीने त्याच्या मोठ्या भावाशी अनैतिक संबंध ठेवले होते म्हणून त्याने राकेशची हत्या केली. मुकेश ३ वर्षापूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी जेलमध्ये गेला होता. यादरम्यान त्याच्या मोठ्या भावाने राकेश रोशनचे संबंध मुकेशच्या पत्नीसोबत जोडले गेले. काही महिन्यानंतर जेव्हा मुकेश जामीनावर बाहेर आला तेव्हा त्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल समजले. जेलमध्ये असताना मुकेश यादवसोबत आशुतोषची मैत्री झाली होती. त्यामुळे जेव्हा आशुतोष जामीनावर जेल बाहेर आला तेव्हा मुकेशने त्याचा पत्नीसंबंधातील सर्व गोष्ट सांगितली. त्यानंतर आशुतोषने मुकेशसोबत मिळून आपल्या मोठ्या भावाची हत्या करण्याचा कट रचला. मुकेश, आशुतोष यांनी त्याच्या मित्राला रामानंदसोबत भाऊ राकेशला दारू पिण्याच्या बहाण्याने गावा बाहेर सीवानमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा मुकेशने मोठ्या भावाला गोळी मारली.


हेही वाचा – संतापजनक! दोन बहिणींचे अपहरण करून १५ जणांनी सहा दिवस केला बलात्कार


 

First Published on: October 31, 2020 2:31 PM
Exit mobile version