यंदा रक्षाबंधन सण ‘असा’ करा साजरा

यंदा रक्षाबंधन सण ‘असा’ करा साजरा

रक्षाबंधन म्हणजे भावाबहिणीचं अतूट नातं. हे नातं अगदीच वेगळं. त्यात आदर तर असतोच पण, आदराबरोबर येतात त्या खोड्या. एकमेकांविषयी असूयाही असते आणि तितकंच प्रेम आणि काळजीही. वयात कितीही अंतर असो पण, हा गोडवा कधीच कमी होत नसतो. तसेच बऱ्याचदा हा सण साजरा करण्यासाठी भाऊ – बहिण बाहेर फिरण्यासाठी किंवा जेवाणासाठी देखील जातात. मात्र, यंदाच्या वर्षी देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे हा सण घरीच साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे हा सण घरच्या घरी कसा साजरा करता येईल पाहुया.

काळ्या रंगाचे कपडे घालू नका

रक्षाबंधन असल्यामुळे आज अनेकांना वर्क फ्रॉर्मला देखील सुट्टी असेल. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन घराची साफसफाई करा. कारण कोरोनाच्या काळात घराची स्वच्छता करणे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर आंघोळ करुन देवाची पूजा करा. तो पर्यंत तुमची लाडकी बहिण औक्षणाची तयारी करेल. आज शुभ दिवस असल्याने शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालू नका.

असे करा औक्षण

औक्षण करताना सर्वप्रथम भाऊ – बहिणींने हाताला सॅनिटाझर करुन घ्यावे. त्यानंतर मास्त घालून डोक्यावर ओढणी किंवा पदर घेऊन बहिणीने औक्षण करावे. यावेळी भावाने देखील डोक्यावर रुमाल ठेवावा आणि डोक्याला चंदनचा टीका लावून औक्षण करावे आणि राखी बांधावी.

यंदा घरीच स्वीट तयार करा

यंदा घरच्या घरीच मिठाई तयार करा. यावर्षी बाहेरुन मिठाई खरेदी करणे शक्यतो टाळा.


हेही वाचा – RakshaBandhan 2020: भावा- बहिणींच ठरलं! यंदा ऑनलाईन होणार रक्षाबंधन!


First Published on: August 3, 2020 10:05 AM
Exit mobile version