गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणारे दोन संशयित शूटर पुणेकर; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणारे दोन संशयित शूटर पुणेकर; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Panjabi Singer Siddhu Musewala) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Police) अधिक तापास केला असता, यामध्ये पुण्यातील दोघेजण असल्याची संशयित माहिती समोर येत आहे.

सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यासाठी एकूण ८ शुटरचा वापर करण्यात आला होतो. या ८ जणांपैकी २ जण महाराष्ट्राच्या पुण्यातील (Pune) असल्याची संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर

सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आले होते. यापैकी तिघे पंजाबचे, तीन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते, असे सांगण्यात येत आहे. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोन शूटरची नावे असून पोलीस अधित तपास आणि चौकशी करत आहेत.

हेही वाचा – Sidhu moose wala murder case : होय, माझ्या टोळीनेच केली मुसेवालाची हत्या, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली

२ जणांविरुद्ध लुकआउट नोटीस जारी

सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याच्या संशयावरून २ जणांविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. संतोष आणि सौरभ हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. दरम्यान, मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे गुन्हे शाखा संतोष जाधवच्या शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

२९ मे रोजी हत्या

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. जीपमधून जात असताना रस्त्यातच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर लॉरेन्स यांनीही सुद्धूच्या हत्येची कबुली दिली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्हीआयपी सुरक्षा काढून घेतल्यानंतर ४८ तासांच्या आतच सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये व्हीआयपींना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – Missile Test: अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाला करारा जवाब, एकाच वेळी केली ८ क्षेपणास्त्रांची चाचणी

First Published on: June 6, 2022 12:55 PM
Exit mobile version