सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Gangster Lawrence Bishnoi in custody of Delhi Police in murder case of Sidhu Musewala
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तिहार जेलमधून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) विशेष पथकाने बिश्नोईकडे मुसेवाला हत्याकांड प्रकरणात चौकशी करणार आहे. या सोबत काला जठेडी आणि काला राणाच्या खून प्रकरणी त्याच्याकडे चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. गँगस्टर बिश्नोईचा हा ताबा 5 दिवसांसाठी आहे.

दिल्ली पोलिसांनी घेतले रिमांडवर –

तिहार जेलमध्ये बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स विश्नोईला (Lawrence Bishnoi) दिल्ली पोलिसांच्या स्पशल सेलने रिमांडवर घेतले आहे. बिष्णोईला कोर्टामार्फत अन्य एका प्रकरणात 5 दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले होते. मात्र, आता सिद्धू प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा –  पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; शवविच्छेदनाच्या अहवालात मोठा खुलासा

तिहारमध्ये लॉरेन्सची सुरक्षा वाढवली –

कॅनडास्थित गोल्डी ब्ररारने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर तिहारमध्ये लॉरेन्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याबाबत सूत्रानी माहिती दिली आहे. पंजाब पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा – गायक सिद्धू मूसेवाल हत्ये प्रकरणी 6 जणांना पंजब पोलीसांच्या ताब्यात

वकिलाने नाकारला मुसेवाला प्रकरणात सहभाग –

गायक सिद्धू मुसेवालांवर (Sidhu Moose Wala) ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलने 30 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मुसेवालांने या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसकडून पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. लॉरेन्सच्या वकिलाने मुसेवाला प्रकरणात त्याच्या सहभाग नाकारला आहे. दरम्यान पंजाब पोलीस प्रमुख व्ही. के. भवरा यांनी ही घटना टोळीयुद्धातून झाली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.