Rajkummar Rao – Patralekha Wedding: राजकुमार राव पत्रलेखाने बांधली लग्नगाठ, पहा लग्नाचे खास फोटो

Rajkummar Rao – Patralekha Wedding:  राजकुमार राव पत्रलेखाने बांधली लग्नगाठ, पहा लग्नाचे खास फोटो

Rajkummar Rao – Patralekha Wedding: राजकुमार राव पत्रलेखाने बांधली लग्नगाठ, पहा लग्नाचे खास फोटो

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवस रंगल्या होत्या. आज दोघांनीही लग्नगाठ बांधली. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सात फेरे घेत साताजन्माच्या गाठी बांधल्या. कुटुंब,मित्र परिवारासोबत पत्रलेख आणि राजकुमार यांचा पारंपरिक पद्धतीने शाही विवाह सोहळा चंदीगडमध्ये पार पडला. दोघांच्या लग्नांची सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघेही लग्नात फार आनंदी दिसत आहेत. राजकुमार रावने त्यांच्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली. तब्बल ११ वर्षांच्या प्रेमाच्या प्रवासानंतर दोघेही आज आयुष्यभरासाठी एकत्र आले आहे.

लग्नाची खुशखबर देताना राजकुमार रावने सुंदर कॅप्शन दिले आहे त्यात त्याने असे लिहिले आहे की, ‘शेवटी ११ वर्षांची मैत्री,प्रेम,रोमांन्स आणि मस्तीनंतर…मी माझ्या सर्वस्वासोबत लग्न केले आहे. माझी सोलमेट,माझी सर्वांत चांगली मैत्रीण,माझ कुटुंब. आज मला तुझा नवरा म्हणण्यापेक्षा मोठा आनंद नाही!’,असे म्हणत राजकुमारने दोघांचे फोटो शेअर केले आहेत.

 

 

पत्रलेखाने देखील तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि राजकुमारसाठी प्रेम व्यक्त केलय. ‘आज सगळ काही, माझ प्रेम,गुन्हातील माझा भागीदार,माझ कुटुंब,माझा आत्मा…. गेल्या ११ वर्षातील माझा सर्वांत चांगला मित्र, तुमची पत्नी होण्यापेक्षा मोठी भावना नाही!’, असे म्हणत पत्रलेखाने फोटो शेअर केले आहेत.

 

लग्नात पत्रलेखाने लाल रंगाची चनीया चोली घातली आहे. डोक्यावर हिरव्या रंगाचा मांग टिका, हातात बांगड्या,कानात झुमके असा पारंपरिक लुक केला होता. तर राजकुमार रावने सफेद रंगाची शेरवानी, डोक्यावर लाल रंगाचा फेटा आणि गळ्यात गुलाबी रंगाची ओढणी घातली आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांचा राजेशाही थाटात विवाह सोहळा पार पडला.

२०१०पासून राजकुमार राव आणि पत्रलेखा एकमेकांना डेट करत होते. तेव्हापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. राजकुमार रावने पहिल्यांदा पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले होते. तर पत्रलेखाने राजकुमारला ‘लव सेक्स और धोका’ या सिनेमात पाहिले होते. त्यानंतर राजकुमार विषयी भावना पत्रलेखाच्या मनात आल्या होत्या. २०१४मध्ये दोघांनी ‘सिटी लाइट्स’ या सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमात दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि ११ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी लग्न केले.


हेही वाचा – Rajkummar Rao – Patralekha Wedding : राजकुमार राव- पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, पाहा लग्नाचे स्थळ, वेळ

First Published on: November 15, 2021 9:20 PM
Exit mobile version