घरमनोरंजनRajkummar Rao – Patralekha Wedding : राजकुमार राव- पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, पाहा...

Rajkummar Rao – Patralekha Wedding : राजकुमार राव- पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, पाहा लग्नाचे स्थळ, वेळ

Subscribe

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा हे १५ नोव्हेंबर म्हणजे आज लग्नबंधनात अडकणार आहे. यापूर्वी शनिवारी रात्री दोघांचा सारखपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. तर १४ नोव्हेंबरला मेंहदी आणि संगीत सोहळा झाला. या खास सोहळ्यात दोघांच्या कुटुंबातील आणि काही खास जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. दरम्यान पत्रलेखाची खास मैत्रीण अभिनेत्री हुमा कुरेशीही चंढिगढमध्ये पोहचली आहे. आज १५ नोव्हेंबर रोजी राजकुमार राव आणि पत्रलेखा चंदिगढमध्ये पारंपारिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान लग्नापूर्वी दोघांच्या लग्नाची पत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्न पत्रिकेचा फोटो अनेक फॅन पेजवरून पोस्ट केला जात आहेत.

राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत असल्याने त्यांच्या लग्न सोहळ्याचे स्थळ आणि वेळही चाहत्यांना माहित पडली आहे. व्हायरल होणारी लग्नपत्रिका पत्रलेखाची आहे. राजकुमार रावच्या फॅनपेजवरून ही पत्रिका मोठ्याप्रमाणात व्हायरल केली जात आहे. या पत्रिकेवर ‘पत्रलेखा आणि राजकुमार रावच्या लग्नसोहळ्यासाठी सोमवारी १५ नोव्हेंबरला चंदीगढमधील ओबेरॉय सुखविलासमध्ये आमंत्रित करत आहोत’ असं लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

पत्रलेखा आणि राजकुमार रावचा चंदिगढमधील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये शनिवारी साखपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान राजकुमार रावने पत्रलेखाला एकदम हटके प्रपोजही केलं. यावेळी राजकुमारने अगदी रोमँटिक स्टाईलने गुडघ्यावर बसून पत्रलेखाच्या हातात अंगठी घातली आहे. या सोहळ्याची थीम पांढऱ्या रंगाची होती. या दोघांचा रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामध्ये पत्रलेखा आणि राजकुमारचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय.

- Advertisement -

गेल्या ७ वर्षांपासून राजकुमार आणि पत्रपलेखा रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांची भेट एका जाहिरातीदरम्य़ान झाली होती. यानंतर दोघांची जोडी ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. ‘सिटीलाईट’ या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. या चित्रपटातून खऱ्या अर्थाने दोघांच्या बॉलिवूडमधील यशाला सुरुवात झाली. मात्र दोघं आता एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.


Sooryavanshi : नेटफ्लिक्सने विकत घेतले ‘सूर्यवंशी’चे डिजिटल हक्क

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -