मरीन ड्राईव्हमध्ये ८ वकीलांविरुद्ध लैगिंक अत्याचार, खंडणीचा गुन्हा दाखल

मरीन ड्राईव्हमध्ये ८ वकीलांविरुद्ध लैगिंक अत्याचार, खंडणीचा गुन्हा दाखल

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ८ वकीलाविरुद्ध अत्याचार, खंडणी, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकील महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली आहे. पीडित महिला ही व्यवसायाने वकील असून ती मागील काही महिन्यांपासून नरिमन पॉईंट येथील एका बड्या वकिलाच्या फर्म मध्ये काम करत होती. तीने सोमवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन ८ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीत तीने फर्म चे मुख्य वकील यांच्यासह इतर आठ जणांनी वेगवेगळ्या वेळी माझा विनयभंग केला तर माझ्यावर लैगिक अत्याचार करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली असा आरोप या पीडित महिला वकीलाने केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये २ महिला वकिलांचा समावेश असून त्याच्या विरुद्ध लैगिक अत्याचार, खंडणी, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे,कट रचणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले आहे. अद्याप या गुन्हयात कुणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली.

First Published on: July 26, 2021 9:38 PM
Exit mobile version