आता हाफकीनला पर्याय, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची झाली स्थापना

आता हाफकीनला पर्याय, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची झाली स्थापना

आरोग्य विभागाचा पदभार मिळाल्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध व अनुषंगिक साहित्य खरेदीसाठी व पुरवठा पद्धती गतिमान व सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापन करण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात हे विधेयक सादर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक संमत करून हा कायदा करण्यात आला आहे. हे विधेयक संमत झाल्यामुळे आता आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व साहित्यांची एकाच ठिकाणी खरेदी करता येणे शक्य होणार आहे.

राज्यामध्ये २०१७च्या आधी औषध, आरोग्य संबंधी यंत्रसामुग्री आणि कन्झुमेबल्स उपकरणे यांची खरेदी त्या-त्या विभागाकडून करण्यात येत होती. ज्यामुळे त्या खरेदीला वेगवेगळे दर प्राप्त होत होचते. त्याचमुळे या खरेदीचा न्युनतम दरासाठी फायदा मिळावा, यासाठी हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित अंतर्गत खरेदी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. २६ जुलै २०१७ यामध्ये शासन निर्णयानुसार ही स्थापना करण्यात आलेली होती. यामुळे एकत्रित साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी ही हाफकीनची होती. त्यांच्याकडील ६० टक्के खरेदीचा सरासरी भर हा आरोग्य विभागाचा आहे. परंतु, यामध्ये सुधारणा होणे हे आवश्यक होते आणि याचसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; मुलींच्या घरी ईडीची छापेमारी

औषधे, औषधी साहित्य, यंत्रसामुग्री, वैद्यकीय उपकरणे, सोनोग्राफी मशीन, डायलेसीस मशीन, व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन मशीन आणि फर्निचर या वस्तूंची या प्राधिकरणाच्या मार्फत खरेदी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य खात्याच्या आठ विभागात याचे गोडाऊन असणार असल्याचे आहे. तर डॉक्टर, खासगी वैद्यकीय वयवसायिक आणि खासगी औषध विक्रेता याठिकाणांहून खरेदी करू शकणार आहेत. केंद्र सरकारच्या यंत्रणांना देखील या माध्यमातून खरेदी करता येणार आहे.

First Published on: March 11, 2023 3:12 PM
Exit mobile version