‘प्रपोज डे’ला मैत्रिणीकडून नकार, दुख: पचवू न शकल्याने प्रियकारने संपवले आयुष्य

‘प्रपोज डे’ला मैत्रिणीकडून नकार, दुख: पचवू न शकल्याने प्रियकारने संपवले आयुष्य

'प्रपोज डे'ला मैत्रिणीकडून नकार, दुख: पचवू न शकल्याने प्रियकारने संपवले आयुष्य

प्रेमात नकार दिल्याने तरुण तरुणी टोकाची पाऊले उचलतात. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. मात्र यंदाचा व्हॅलेंटाईन वीक काही धक्कादायक घटनांनी सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसात आत्महत्या, हत्यांचे अनेक प्रकार समोर येत आहेत. प्रेमात नकार मिळणे, विविहबाह्य संबंधातून हत्या करणे ही या मागची प्रमुख कारणे समोर येत आहेत. महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नागपूर, मुंबई नंतर आता नाशिकमधूनही असाच धक्कादायक प्रकार समोर येत आहे.मैत्रिणीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या करुन आपले जिवंत संपवले. नाशिकमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या इंदिरानगर भागात ही घडली आहे. परिसरात घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजय अनिल थोरात असे मृत तरुणाचे नाव आहे. इंदिरानगर भागातील राजसारथी सोसायटीमध्ये तो भाड्याच्या घरात राहत होता. २५ वर्षांचा अजय थोरात हा उच्चशिक्षित होता. त्याची एका मुलीसोबत मैत्री झाली होती. त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला होता. प्रपोज डेचे निमित्त साधून अजयने आपल्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने लग्नासाठी नकार दिला. अजय हा नकार पचवू शकला नाही. त्याला यातून नैराश्य आले. या नैराश्यातून अजयने त्याच्या राहत्या घरी पंख्यांला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. अजयचा रुम पार्टनर घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता. मित्राने घराचा दरवाजा ठोठावला, अजयला खूप फोन केले पण त्याचा काही प्रतिसाद आला नाही. मित्राने ही माहिती त्वरित पोलिसांनी दिली. पोलिसांनी घराच्या छतावर चढून आत डोकावून पाहिले असता अजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

प्रेमात नकार मिळाल्याने प्रेयसीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या जागेश्वरी येथून समोर आला होता. यात प्रियकर आणि प्रेयसी दोघांचा मृत्यू झाला. भररस्त्यात प्रेयसीला जाळणे, प्रेमभंगातून नैराश्य आल्याने स्वत:चे आयुष्य संपवणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे.


हेही वाचा – प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर टाकले पेट्रोल, मग प्रेयसीनेही घडवली अद्दल

 

 

First Published on: February 10, 2021 12:57 PM
Exit mobile version