फेसबुकवरची पूजा नीघाली शेजारचा बलदेव; हवाई दलाचा अधिकारी फसला हनी ट्रॅपच्या जाळ्यात

फेसबुकवरची पूजा नीघाली शेजारचा बलदेव; हवाई दलाचा अधिकारी फसला हनी ट्रॅपच्या जाळ्यात

आग्रामध्ये हवाई दलाचा एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये सापडला आहे. फेसबूकवर एक मुलीच्या नावाचं खोटं अकाऊंट तयार करत या अधिकाऱ्याला फसवण्यात आलं. अधिकाऱ्याचे व्हिडीओ आणि फोटो तयार करण्यात आले. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत १० हजार रुपये तर कधी ६० हजार रुपये खात्यात जमा करण्यास सांगितले. त्या अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर आरोपींपैकी एक आरोपी बलदेवसिंग याला अटक करण्यात आली. आरोपी अधिकाऱ्याच्या नात्यातील भाऊ निघाला.

काग्रौलमधील अकोला येथे हवाई दलाचे अधिकारी अंबाला येथे तैनात आहेत. लॉकडाऊन दरम्यान फेसबुकवर पूजा नावाच्या आयडीची रिक्वेस्ट आली. यामध्ये मुलीचा पत्ता पंजाबचा लिहिला होता. अधिकाऱ्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. दोघे फेसबुक मेसेंजरवर बोलू लागले. पूजा नावाच्या मुलीचे छायाचित्र होते. यामुळे अधिकाऱ्याला हे समजलं की ती महिला खूप चांगल्या घराची आहे. एके दिवशी गप्पा मारत असताना त्या अधिकाऱ्याला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितलं. हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला गेला.

अश्लील व्हिडीओ बनवून बदनाम करण्याची धमकी

अचनेरा पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक उदयवीर मलिक यांनी सांगितलं की, आरोपी व्हिडीओ आणि फोटो अश्लिल करून बदनामी करण्याची धमकी देत होता. जुलैमध्ये अधिकाऱ्याने एसएसपी बबलू कुमार यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणात सायबर सेलने तपास केला. फेसबुक आयडी बंद करण्यात आला. आरोपी बलदेवसिंगला फेसबुकवरून मिळालेल्या माहितीवरून पकडण्यात आले. आरोपी हा अधअकाऱ्याच्या शेजारी राहणारा होता.

 

First Published on: October 17, 2020 8:21 PM
Exit mobile version