एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीच्या कार्यालयावर NIA ची छापेमारी

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीच्या कार्यालयावर NIA ची छापेमारी

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा

अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणात अटकेत असलेले माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आज एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयावर पुन्हा छापेमारी सुरु केली आहे. प्रदीप शर्मा यांच्या पी.एस. फाउंडेशन या संस्थेच्या अंधेरी पूर्व येथील कार्यालवर आज एनआयएने छापेमारी सुरू केली आहे.

यापूर्वी देखील एनआयएकडून या संस्थेच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी एनआयएने या कार्यालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. प्रदीप शर्मा सध्या एनआयएच्या कोठडीत असून त्यांच्या चौकशीदरम्यान एनआयएच्या हाती काही महत्वाची माहिती लागली आहे. त्या अनुषंगाने ही छापेमारी सुरू असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणी यापूर्वी १७ जूनला प्रदीप शर्मा यांच्या घरावर आणि कार्यालयावर एनआयएने छापेमारी केली होती. त्यानंतर काही तासांतच प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात एनआयएने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. स्कॉर्पिओचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे असून या दोन्ही प्रकरणात वाझे यांच्या संपर्कात प्रदीप शर्मा होते, असं एनआयएचे म्हणणे आहे.


Personal Loan घेतायं! मग ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, होईल तुमचाच फायदा


 

First Published on: June 23, 2021 6:58 PM
Exit mobile version