धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न

धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न

पुण्यात पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे हा प्रकार घडला. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळला. दरम्यान सासवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

असा घडला प्रकार

आंबोडी येथील एका शेतामध्ये दोन तरुण शेतात खड्डा खोदत होते. परिसरातील शेतात काम करणारे काही लोक या ठिकाणी आले असता त्यांना याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी लांबूनच त्यांना काय करताय? हे विचारले. मात्र, यानंतर त्यांनी तेथून दुचाकीहून पळ काढला. मात्र, जाताना ते अर्भक तिथेच सोडून दिले.

शिवारात दुचाकीवरून आलेले दोन तरुण एका नवजात अर्भकाला जिवंत पुरणाचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पहिल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला अडवले. नंतर या तरुणांनी अर्भक तिथेच सोडून पळ काढला आहे. हे अर्भक आता सुरक्षित असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी जेजुरी येथे पाठवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तसेच, पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात घेतले असून त्याला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील तपासणी नंतर या अर्भकाला पुणे येथे ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.


Live Update: डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता – पुणे महापौर
First Published on: October 29, 2020 8:26 AM
Exit mobile version