Porn films case : राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, पत्नी शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार

Porn films case : राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, पत्नी शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार

Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार माजी कर्मचारी झाले साक्षीदार, केले खळबळजनक खुलासे

पॉर्नोग्राफी फिल्म प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण राज कुंद्राचे कर्मचारी, मॉडेल्स आणि इतर संबंधीत व्यक्ती त्याचे साक्षीदार बनणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे. कारण राज कुंद्राविरोधात आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टी देखील जबाब नोंदवणार आहे.

राज कुंद्रासह त्याच्या साथीदारांविरोधात एक हजार ४६४ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात कुंद्रालाच मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. राज कुंद्रा,सह रायन थोरपे, यश ठाकूर उर्फ ​अरविंद श्रीवास्तव आणि प्रदीप बक्षी यांचा समावेश आहे. यश उर्फ अरविंद फरार आहे आणि तो सिंगापूरमध्ये राहत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी लंडनमध्ये असल्याचे सांगितलं जात आहे. चार्जशीटमध्ये तब्बल ४३ सक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे राज कुंद्राचा पाय आणखी खोलात जाणार आहे.

२०२१ मध्ये मुंबई क्राईम ब्रांचने फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफी प्रकरण समोर आले आहे. तेव्हापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान पोर्नोग्राफी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. यात एप्रिल महिन्य़ात ९ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. मुंबई क्राईम ब्रान्चला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मठ भागातील एका बंगल्यात धाड टाकली.

त्या बंगल्यात अश्लील चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होते. पोलिसांनी त्या ठिकाणाहून एका महिलेला रेस्क्यू देखील केलं. चित्रपटांमध्ये काम देण्याचं वचन देत पॉर्न व्हिडिओमध्ये काम करण्यास भाग पाडलं. याप्रकरणी अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल केली.


 

First Published on: September 16, 2021 11:49 AM
Exit mobile version