गावावरुन मदतीसाठी बोलावलेल्या तरुणीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

गावावरुन मदतीसाठी बोलावलेल्या तरुणीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

प्रातिनिधीक फोटो

हाताची शस्त्रक्रिया झाल्याचं सागून गावाववरुन मदतीसाठी बोलावलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. आरोपीने पीडित तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खंडणी मागितली. याप्रकरणी पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी सुरेंद्रनाथ आवळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. आरोपी आवळे याने त्याच्या हाताची शस्त्रक्रिया झाल्याचं सांगून पीडित तरुणीला २०१८ मध्ये पुण्यात बोलावून घेतलं. त्यानंतर आरोपीने तिला त्याच्या मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, आरोपीने घटनेचं चित्रीकरण केलं. अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर आरोपीने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणीने याप्रकरणी सांगली येथील संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, घटना पुण्यात घडल्याने सांगली पोलिसांनी हा गुन्हा सिंहगड पोलिसांकडे वर्ग केला.

 

First Published on: January 7, 2021 10:51 AM
Exit mobile version