भाजप – काँग्रेसमध्ये रंगले ‘आजादी’ वॉर, व्हिडिओ व्हायरल

भाजप – काँग्रेसमध्ये रंगले ‘आजादी’ वॉर, व्हिडिओ व्हायरल

भाजप आणि काँग्रेस ट्विटरवर आमने-सामने

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ चित्रपटातील रॅप सध्या खूपच गाजत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे ४ दिवस उरले असताना,  यातील एका गाण्यावरुन चक्क भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘ट्वीटर वॉर’ रंगल्याचं चित्र दिसत आहे. ‘गली बॉय’मधील ‘आजादी’ या गाणावरुन हे ट्वीटर वॉर रंगलं आहे. भाजपने मूळ आजादी गाण्याच्या चालीवर काँग्रेसवर टीका करणारं एक नवं गाणं तयार केलं होतं. या गाण्यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. काँग्रेसनेही ‘आजादी’ गाण्याच्या धर्तीवर असंच एक गाणं तयार करत भाजपला जोरजार टोला लगावला आहे.

सोशल मीडियावर कोणताही फोटो असो किंवा व्हिडिओ हा वाऱ्यासारखा पसरत असतो. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धीही मिळते. याचाच वापर आता देशातील दोन मोठ्या राजकीय पक्षांनी केल्याचं दिसत आहे. निवडणुका तोंडावर आल्या की राजकारणी एकमेकांचा पाण-उतारा करण्यासाठी तसंच जनतेच्या नजरेत प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या युक्ता लढवत असतात. याच धर्तीवर भाजप आणि काँग्रेसने ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘आजादी’ या रॅप साँगचा एकमेकांविरुद्ध वापर करून घेतला आहे. सोशल मीडियावर हे दोन्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

भाजपने गली बॉय रॅपवर ‘काँग्रेस से आजादी’ असं गाणं बनवलं आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘खूप वर्ष काँग्रेसचं सरकार असूनही देशाची प्रगती झाली नाही’ हा मुद्दा या व्हिडिओमध्ये मांडला आहे. ‘राहुल गांधी आता रात्रभर असा विचार करत राहतील की उद्या काय खोटं बोलायचं’, असं खोचक कॅप्शन भाजपने या व्हिडिओला दिलं आहे.

काँग्रेसने याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार केलेल्या गाण्यात, ‘भाजपमुळे सामन्य नागरिकांना होणार त्रास मांडला आहेत. ‘डर के आगे आजादी #Azadi’ असं कॅप्शन काँग्रेसने या व्हिडिओला दिलं आहे.

भाजप-काँग्रेसच्या या ट्विटर वॉरची ‘आम आदमी पार्टी’ मजा घेताना दिसत आहे. या पक्षाने GIF च्या द्वारे यावर गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: February 10, 2019 6:10 PM
Exit mobile version