आता १०, १२ वीचा अभ्यास थेट टीव्हीवरुन; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता विषय?

आता १०, १२ वीचा अभ्यास थेट टीव्हीवरुन; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता विषय?

टीव्हीवर १० वी, १२ वीचा अभ्यास सुरु

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींना बंदी आहे. तसेच महाविद्यालय आणि शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, याचा फटका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरता मध्य प्रदेश सरकारनी दूरदर्शनवर अभ्यासक्रम सुरु केला आहे. सोमवारपासून या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

दूरदर्शनवर घेण्यात येणार अभ्यास

मध्य प्रदेशमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. दूरदर्शवर दुपारी १२ वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांचा घर बसल्या एक तास क्लास घेतला जात आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत शिकवले जात आहे.

११ मे ते ३० जूनपर्यंत असणार क्लास

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे मुलांच्या शाळा, महाविद्यालय आणि खासगी शिकवणी बंद आहे. मात्र, असे असताना देखील मुलांच्या अभ्यासात व्यत्य येऊ नये, याकरता हा पर्याय निवडण्यात आला आहे. बऱ्याचदा काही मुलांकडे मोबाईल, इंटरनेट या गोष्टी उपलब्ध नसतात. मात्र, या सर्व गोष्टींमुळे मुलांचे कुठेही नुकसान होऊ नये, याकरता थेट दूरदर्शनवरच शिकवणी घेतली जाणार आहे. हे क्लास ११ मे ते ३० जूनपर्यंत सुरु राहणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना भीती वाटणारे गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जाणार आहेत.

कोणत्या दिवशी कोणता विषय शिकवणार

इयत्ता १२ वी – दुपारी ३ ते ४

१८ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

दूरदर्शनवर घेण्यात येणाऱ्या क्लासचा एकूण १८ लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे इंटरनेटद्वारे विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारु देखील शकतात. त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे.


हेही वाचा – झारखंड मॉब लिंचिंग: बकरीच्या चोरीवरून दोन तरुणांना मारहाण; एकाचा मृत्यू


First Published on: May 12, 2020 11:36 AM
Exit mobile version