अबब! शार्कचा अडीच कोटी वर्षांपूर्वीचा दात

अबब! शार्कचा अडीच कोटी वर्षांपूर्वीचा दात

व्हाईट शार्कपेक्षा मोठ्या शार्कचा दात

शार्क हा समुद्रातला सगळ्यात भयानक मासा… शार्कमधील व्हाईट शार्क ही सगळ्यात जास्त मोठी आणि तितकात जीवघेणा असा समुद्रातला मासा आहे. पण यापेक्षाही कित्येकपटीने मोठा मासा समुद्रात होता. त्याचे पुरावे देखील आता सापडले आहेत. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नमध्ये अडीच कोटी वर्षांपूर्वीच्या शार्कचा दात सापडला आहे. या दाताचा आकार पाहूनच तुम्हाला हा शार्क किती मोठा असेल याचा अंदाज नक्कीच आला असेल. ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी फेरफटका मारताना हा दात सापडला असल्याचे देखील समजत आहे.

नामशेष झालेली ग्रेट जॅग्ड शार्क आणि द ग्रेट व्हाईट शार्क

कुठे सापडला दात?

मेलबर्न शहरापासून १०० किलोमीटर लांब जन जुक नावाचा समुद्र किनारा आहे. जीवाश्म सापडण्याचे ते महत्त्वाचे ठिकाण आहे. जीवाश्म अभ्यासक काहीतरी नवे सापडण्यासाठी या ठिकाणी फेरफटका मारत असतात. गुरुवारी असाच फेरफटका मारताना काहीतरी चमकणारी वस्तू दिसली. ती काढल्यावर तो दात असल्याचे कळाले. अधिक संशोधनानंतर हा शार्कचा दात असल्याचे कळाले. हा दात सेंटीमीटर लाबींचा असून हा ग्रेट जॅग्ड नॅरो टुथ शार्कचा असल्याची माहिती या संशोधकांकडून देण्यात आली. ही प्रजाती आता नामशेष झाली आहे.

ग्रेट व्हाईट शार्क (सौजन्य- वीकिपीडिया)

दोन दात सापडण्याची पहिलीच वेळ

आतापर्यंत संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एकावेळी एकाच शार्कचे दोन दात पहिल्यांदाच सापडले आहेत. अधिक शोध घेतल्यानंतर या परीसरात शार्कचे एकूण ४० दात सापडले आहेत. पण हे वेगवेगळ्या शार्कचे आहेत. यातील काही दात सिक्सगील जातीच्या शार्कचे असून ते आता फक्त विक्टोरिअन कोस्टलाईनवरच आहेत.

First Published on: August 10, 2018 7:55 PM
Exit mobile version