दोन भारतीय मच्छीमार नौका पाकिस्तानच्या ताब्यात; अटक केलेल्या 16 खलाशांमध्ये 7 जण पालघरमधील

दोन भारतीय मच्छीमार नौका पाकिस्तानच्या ताब्यात; अटक केलेल्या 16 खलाशांमध्ये 7 जण पालघरमधील

खोल समुद्रात मासेमारी करत असताना दोन बोटी भरकटल्या. या भरकटलेल्या बोटींना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवर एकूण 16 जण होते ते सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. या 16 जणांमध्ये 7 जण पालघर जिल्ह्यातील असल्याचीसुद्धा माहिती मिळत आहे. दरम्यान पालघरमधील मच्छिमार संघटनेनं (Fishermen’s Association in Palghar) यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने (Pakistan Maritime Security Agency) ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बोटीतील माणसांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पालघरमधील(palghar) मच्छिमार संघटनेनं दिली आहे.

हे ही वाचा – भारतात ‘Xiaomi’वर ईडीची मोठी कारवाई; कंपनीचा 5551 कोटी रुपयांचा निधी गोठवणार

पालघर जिल्ह्यामधील खलाशी रोजगार मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यातील ओखा आणि पोरबंदर या भागात जातात. जवळपास दहा ते बारा हजार मच्छिमार कामगार पालघर जिल्ह्यांमधून गुजरात राज्यातील या भागांमध्ये रोजगार मिळविण्यासाठी जातात. याच भागातील दोन बोटी भरकटल्याने पाकिस्तानच्या(pakistan) हद्दीत गेल्या आहे. त्यामुळे या बोटींवरील एकूण सोळा मच्छीमार खलाशी मजुरांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा – खर्गेंना अधिकृत उमेदवार म्हणून का दाखवलं जातंय?, शक्तीप्रदर्शनानंतर शशी थरुर यांचा सवाल

गुजरातच्या समुद्रात मासेमारी कारण्यासाठी दोन बोटी आणि त्यामधील 16 खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली. 7 खलाशी पालघर जिल्ह्यातील असून. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी जवळील एका गावातील हे मच्छीमार खलाशी कामगार आहेत.

गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि एक मच्छीमार बोट मासेमारीसाठी गेली होती. या बोटींवरील एकूण 7 खलाशी पालघर जिल्ह्यातील आहेत. पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने या सर्व खलाशांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुद्धा सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस अॅन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी दिली.

हे ही वाचा – भारतीयांनो पर्यटनासाठी श्रीलंकेत या; सनथ जयसूर्याचे भावनिक आवाहन

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले पालघरमधील 7 खलाशी

1- नवशा महाद्या भिमरा
2- विजय नागवंशी
3- सरित उंबरसाडा
4- जयराम ठाकर
5- उमजी पाडवी
6- कृष्णा बुजड
7- विनोद कोल

 

First Published on: October 1, 2022 10:40 AM
Exit mobile version