घरताज्या घडामोडीभारतीयांनो पर्यटनासाठी श्रीलंकेत या; सनथ जयसूर्याचे भावनिक आवाहन

भारतीयांनो पर्यटनासाठी श्रीलंकेत या; सनथ जयसूर्याचे भावनिक आवाहन

Subscribe

भारताच्या शेजारी असलेला श्रीलंका देश गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आर्थिक परिस्थिती खालवल्यामुळे या देशातील जनतेला अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या चुकांमुळे श्रीलंकेतील सर्व नागरिक अडचणीत आले आहेत.

भारताच्या शेजारी असलेला श्रीलंका देश गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आर्थिक परिस्थिती खालवल्यामुळे या देशातील जनतेला अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या चुकांमुळे श्रीलंकेतील सर्व नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे आपल्या देशातील नागरिकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी माजी दिग्गज क्रिकेटपटू पुढाकार घेताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे महान फलंदाज सनथ जयसूर्या याने भारतीय जनतेला भावनिक आवाहन केले आहे. (Sanath Jayasuriya Appeal Indians To Visit Sri Lanka In Large Numbers It Helps Over Come Financial Crisis)

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने भारतीयांना मोठ्या संख्येने श्रीलंकेला जाण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या आपल्या देशाला मदत होईल, असे जयसुर्याचे मत आहे. सनथ जयसूर्या श्रीलंकेच्या पर्यटनाचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. तसेच, श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासाकडून बुधवारी आयोजित एक कार्यक्रमात हे आवाहन केले.

- Advertisement -

सनथ जयसुर्याचे आवाहन

“आमच्यासाठी मागील काही महिने खूप कठिण होते. त्यावेळी भारतासह इतर देशातही याबबातचे सविस्तर वृत्तांकन झाले. मात्र आता मला वाटतं की श्रीलंकेतील बदललेल्या परिस्थितीनंतर आम्ही वेगळ्या रोड मॅपवर चालत आहोत. आम्ही एका नव्या दिशेने जाण्यास इच्छुक आहोत. मला असे वाटते की, पर्यटनाच्या क्षेत्रात श्रीलंकेला विशेष मदत करण्याची गरज आहे. श्रीलंका हा पर्यटनावर अवलंबून आहे. येणाऱ्या पर्यटकांना देण्यासाठी श्रीलंकेकडे खूप काही आहे. सध्याच्या घडीला आम्हाला भारताकडून समर्थन हवे आहे. मला आशा आहे की भारताचे लोक श्रीलंकेला पूर्ण समर्थन देतील”, असे आवाहन सनथ जयसुर्या याने म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये 36 व्या नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात; देशभरातून 7000 स्पर्धकांचा समावेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -