८ राज्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू

८ राज्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू

heavy rain

भारतातील तीन राज्यांना अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि नवी दिल्ली अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे राजस्थान, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह पडलेला पाऊस आणि वीज कोसळून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानमध्ये ९ आणि गुजरातमध्ये ९ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर ४० जण जखमी झाले आहेत. हवामान खात्याने बुधवार आणि गुजरातमध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे ११ जणाचा मृत्यू झाला. तर मध्यप प्रदेशमध्ये १६, राजस्थानमध्ये ७, पंजाब २, हरियाणा १, झारखंड १, महाराष्ट्र १, उत्तरप्रदेश १ आणि हिमाचल प्रदेशमध्ये १ अशा एकूण ४१ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढच्या २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसचं गुरुवारपासून पुन्हा गरम व्हायला सुरुवात होणार आहे.

गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरात राज्यातील ३३ पैकी १८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला.

First Published on: April 17, 2019 11:28 AM
Exit mobile version