काश्मिरच्या शोपियनमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मिरच्या शोपियनमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियनमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

दहशवाद्यांविरोधात लष्करानं आता जोरदार मोहिम उघडली आहे. जम्मू – काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील किलोर गावात ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. मध्यरात्रीपासून दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या चकमकीमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर – ए – तोएबाचे असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून एके – ४७ जप्त करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्रभर सुरू असलेल्या चकमकीनंतर शनिवारी सकाळी दहशवादी ठार झाल्याची माहिती लष्कराने जारी केली. शोपियन जिल्ह्यातील किलोर गावामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाने लष्कराला दिली. त्यानंतर लष्कराने शोधमोहिम राबवली. शिवाय, बारामुल्लामध्ये देखील शोध मोहिम राबवण्यात आली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली. ज्यामध्ये एक जवान शहिद झाला. विजय कुमार असे या शहिद जवानाचे नाव आहे.


वाचा – सावधान! ६०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

६०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

भारतातील दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी आणि सीमीवर्ती भागात दहशत पसरवण्यासाठी तब्बल ६०० दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सुरक्षा दलांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतचा अहवाल गृहमंत्रालयाला देखील सादर केला आहे. खुद्द पाक लष्करच या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहकार्य करणार असल्याची माहिती देखील गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. भारत – पाक सीमेवरील विविध भागांमध्ये घुसखोरी करण्यासाठी हे दहशतवादी दबा धरून बसले आहेत. तसेच पाकिस्तानातील काही सैनिक देखील दहशतवाद्यांच्या रूपाने भारतामध्ये घुसखोरी करणार आहेत. असे देखील या अहवालामध्ये म्हटले आहे. या सैनिकांना बॅट असे म्हणतात. बॅट म्हणजेच बॉर्डर अॅक्शन टीम होय. दहशतवाद्यांच्या साथीने बॅट देखील भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. यापूर्वी देखील बॅटने भारतीय सैन्यादलावर हल्ला केला होता. त्यावेळी जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. यावर भारताने पाकिस्तानकडे तीव्र निषेध देखील व्यक्त केला होता. पण, आता तब्बल ६०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीमध्ये असल्याने लष्कराला देखील सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत.


वाचा – अनंतनाग येथे दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद
First Published on: August 4, 2018 10:45 AM
Exit mobile version