घरदेश-विदेशसावधान! ६०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

सावधान! ६०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

Subscribe

भारतामध्ये ६०० दहशतावादी घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. गुप्तचर यंत्रणांनी त्यासंबंधीचा अहवाल गृहमंत्रालयाला सादर केला आहे.

भारतातील दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी आणि सीमीवर्ती भागात दहशत पसरवण्यासाठी तब्बल ६०० दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सुरक्षा दलांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतचा अहवाल गृहमंत्रालयाला देखील सादर केला आहे. खुद्द पाक लष्करच या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहकार्य करणार असल्याची माहिती देखील गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. भारत – पाक सीमेवरील विविध भागांमध्ये घुसखोरी करण्यासाठी हे दहशतवादी दबा धरून बसले आहेत. तसेच पाकिस्तानातील काही सैनिक देखील दहशतवाद्यांच्या रूपाने भारतामध्ये घुसखोरी करणार आहेत. असे देखील या अहवालामध्ये म्हटले आहे. या सैनिकांना बॅट असे म्हणतात. बॅट म्हणजेच बॉर्डर अॅक्शन टीम होय. दहशतवाद्यांच्या साथीने बॅट देखील भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. यापूर्वी देखील बॅटने भारतीय सैन्यादलावर हल्ला केला होता. त्यावेळी जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. यावर भारताने पाकिस्तानकडे तीव्र निषेध देखील व्यक्त केला होता. पण, आता तब्बल ६०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीमध्ये असल्याने लष्कराला देखील सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत.

कोणत्या भागातून होऊ शकते घुसखोरी

जम्मू – काश्मीरमधील गुरेज सेक्टरमधून ६७, माच्छिल सेक्टरमधून ९६, कारेन सेक्टरमधून ११७, तांगधर सेक्टरमधून ७९, उरी सेक्टरमधून २६, रामपूर सेक्टरमधून २६, पूँछ सेक्टरमधून ४३, क्रिष्णा घाटी सेक्टरमधून २१, भीमबर सेक्टरमधून ४० आणि नौशेरा सेक्टरमधून ६ दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत.

- Advertisement -

६०० दहशतवादी घुसखोरी करणार

दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी ६०० दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करणार आहेत. त्यासाठी पाकिस्तान लष्कर त्यांना मदत करणार आहेत. तसेच पाकिस्तानी लष्करातील बॅटच्या टीमचे देखील काही सदस्य दहशतवाद्यांसोबत भारतामध्ये घुसखोरी करून लष्करावर हल्ला करणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी यासंदर्भातील अहवाल गृहमंत्रालयाला सादर केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारतामध्ये होणारी ही सर्वात मोठी घुसखोरी असणार आहे. यापूर्वी २०१६ साली भारताने सर्जिकल स्टाईक करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तान बदला घेण्यासाठी प्रत्येक प्रकारचे प्रयत्न करत आहे.

‘…तर दोन पावले पुढे येईन’

पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी क्रिकेटर इम्रान खानच्या तेहरीक – ए – इन्साफ पक्षाने ११५ जागी विजय मिळवला. निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर इम्रान खान यांनी पाकिस्ताानी जनतेचे आभार मानले. त्यावेळी बोलताना इम्रान खान यांनी भारत एक पाऊल पुढे आल्यास मी दोन पावले पुढे यायला तयार असल्याचे म्हणत भारताकडे मैत्रिचा हात पुढे केला. शिवाय, भारत – पाक संबंध सुधारण्याची गरज देखील व्यक्त केली. पण, इम्रान खान यांना लष्कराचा पाठिंबा पाहता भारत- पाक संबंध सुधारतील का? अशीच शंका उपस्थित केली जात होती. पण आता ६०० दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या शक्यतेमुळे इम्रान खान सत्तेवर येताच दहशतवादाला प्रोत्साहन मिळत आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

- Advertisement -

 

वाचा – संसदेवर हल्ल्याच्या तयारीमध्ये खलिस्तानी दहशतवादी

वाचा – अनंतनाग येथे दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -