’56 इंच’ थाळी, साडे आठ लाखांचं बक्षीस; मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील हॉटेल मालकाची आगळीवेगळी भेट

’56 इंच’ थाळी, साडे आठ लाखांचं बक्षीस; मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील हॉटेल मालकाची आगळीवेगळी भेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi birthday) यांचा उद्या म्हणजे 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मोदींचे अनेक चाहते त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतात. पण दिल्लीमधील(dehli) एका हॉटेलच्या मालकाने मोदींना वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी भेट देण्याचे ठरविले आहे. दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये एक विशेष थाळी तयार करण्यात आली आहे. या थाळी मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे एकूण 56 पदार्थ असतील. त्यामुळे ग्राहकांसाठीसुद्धा ही विशेष पर्वणी असणारा आहे.

हे ही वाचा –  Modi Govt 3 Years: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण, पुढील 15 दिवस जनसंपर्क अभियान

दिल्लीमध्ये असलेल्या कनॉट प्लेस इथल्या ARDOR 2.1 या हॉटेलमध्ये ही विशेष थाळी मिळणार आहे. ”भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी सन्मान करतो (pm narendra modi birthday). मोदी आपल्या देशाची शान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना एक अनोखी भेट देऊ इच्छितो आणि म्हणून आम्ही एक भव्य थाळी निर्माण करत आहोत. या थाळीचं नाव ’56 इंच’ आहे. आम्ही ही थाळी त्यांना भेट देऊ इच्छितो आणि आमची इच्छा आहे की त्यांनी इथे येऊन खावी. पण पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही असं करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थकांना विनंती करत आहोत की,ज्यांचं मोदींवर प्रेम आहे, त्यांनी या हॉटेलमध्ये यावं आणि या विशेष थाळीचा मनमुराद आस्वाद घ्यावा”. असं हॉटेलचे मालक सुमित कलारा म्हणाले.

हे ही वाचा – नामिबियातून जयपूरला नव्हे तर ग्वाल्हेरला आणले जाणार चित्ते, अखेरच्या क्षणी निर्णयात बदल

त्याच बरोबर हॉटेल मालक सुमित कलारा यांनी या थाळीवर आकर्षक बक्षीस सुद्दा ठेवलं आहे. कोणत्याही जोपडप्यापैकी एकाने ही विशेष थाळी जर का 40 मिनिटांमध्ये संपवली तर त्या व्यक्तीला ‘साडे आठ लाख’ रुपयांचे रोख बक्षीस सुद्धा दिले जाईल. त्याचबरोबर केदारनाथ यात्रा सुद्दा या बक्षीसामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

हे ही वाचा –  युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्थांमध्ये प्रवेश नाही; केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

उद्या 17 सप्टेंबर आपल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) अहमदाबाद मध्ये जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतील. त्यानंतर मोदी मध्यप्रदेश मधील कूनो नॅशनल पार्क येथे जातील जिथे नामिबियातून 8 चित्ते आणले जाणार आहेत. भाजपकडूनही (bjp) मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

 

 

First Published on: September 16, 2022 12:16 PM
Exit mobile version