घरदेश-विदेशModi Govt 3 Years: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण, पुढील...

Modi Govt 3 Years: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण, पुढील 15 दिवस जनसंपर्क अभियान

Subscribe

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सत्तेत आठ वर्षे पूर्ण केलीत. एनडीए सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने मोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी मोठी योजना आखली आहे.

नवी दि्ललीः Modi Government 3 Years Of 2.0: देशातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला आज 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप आजपासून 15 दिवसांचं जनसंपर्क अभियान चालवणार आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करून सलग दुस-यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर येण्याची ही पहिलीच वेळ होती. तीन वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 30 मे रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सत्तेत आठ वर्षे पूर्ण केलीत. एनडीए सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने मोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी मोठी योजना आखली आहे. यानिमित्ताने उद्या शिमल्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. या समारंभाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत.

- Advertisement -

उद्या सिमल्यात मेगा रॅली!

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीसाठी शिमल्याची निवड केली हा हिमाचल प्रदेशसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे सर्व जिल्हा मुख्यालये जोडली जाणार आहेत. हिमाचलसाठी ही मोठी संधी आहे, ज्याचा फायदा राज्याला होणार आहे. भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण

त्याआधी दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारमध्ये सामील असलेले मंत्री दावा करत आहेत की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गेली 8 वर्षे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मूळ मंत्राने काम करत आहे. 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 2014 पेक्षाही मोठा जनादेश मिळवण्यात यश आले. एनडीए आघाडीला लोकसभेत 353 जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या.

- Advertisement -

हेही वाचाः Nepal Plane Crash: तारा एअरच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले, नेपाळ लष्कराने दुर्घटनास्थळाचे फोटो शेअर

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -