नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान जखमी

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान जखमी

संग्रहित फोटो

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी देखील छत्तीसगडमधील बिजापूर येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरूंग स्फोटात ६ जवान जखमी झाले असून दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, जवानांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छत्तीसगडमध्ये विधामसभा निवडणुकांची धामधूम सुरू असून नक्षल्यांनी मात्र त्याला विरोध दर्शवला आहे. बिजापूर हे नक्षलग्रस्त अतिसंवेदशील भागांमध्ये मोडतं. याठिकाणी १२ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान देखील पार पडलं आहे. दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यावेळी जवळपास ६० टक्के लोकांनी आपला मतदाना हक्क बजावला. तर, दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे २० नोव्हेंबर रोजी होणार असून ११ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. छत्तीसगडमध्ये मुख्यत: काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत होत आहे.

निवडणुकीपूर्वी स्फोट

छत्तीसगडमध्ये १२ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. पण, त्याच्या एक दिवस अगोदर अर्थात ११ नोव्हेंबर रोजी कांकेरे येथे नक्षलवाद्यांनी सहा आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामध्ये बीएसएफचा एक जवान जखमी झाला. कंकार कोयली बेडामध्ये असणाऱ्या गट्टकल आणि गोमगावाच्यामध्ये ६ ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॉम्ब पूरून ठेवले होते.

वाचा – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह कॅमेरामनचा मृत्यू

कॅमेरामनचा देखील मृत्यू

३० ऑक्टोबर रोजी नक्षलवाद्यांनी दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर केलेल्या हल्ल्यामध्ये दूरदर्शनाच्या कॅमेरामनसह दोन पोलिसांचा देखील मृत्यू झाला होता. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपुर भागात नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी पत्रक काढत त्यावर पत्रकारांना ठार करण्याचा उद्देश नसल्याचं म्हटलं होतं.

वाचा – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ६ बॉम्बस्फोट

First Published on: November 14, 2018 10:52 AM
Exit mobile version