अफवांवर विश्वास ठेऊ नका; एका अफवेने घेतला ७२८ जणांचा बळी

अफवांवर विश्वास ठेऊ नका; एका अफवेने घेतला ७२८ जणांचा बळी

अफवांवर विश्वास ठेऊ नका; एका अफवेने घेतला ७२८ जणांचा बळी

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून प्रत्येक देशाला कोरोनाने वेढले आहे. या कोरोनावर उपचार करण्यासाठी अनेक वैज्ञानिक शोध घेत आहेत. मात्र, या कोरोना विषाणूवर अद्याप औषध निघालेले नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी अल्कोहलचे सेवन केल्यास कोरोना बरा होतो, अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. मात्र, याच अफवेला बळी पडून ७२८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक अंध झाल्याची धक्कादायक घटना इराणध्ये घडली असून या घटनेची माहिती इराण सरकारने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या अफवेमुळे इराणमध्ये हजारो लोक इंडस्ट्रिअल अल्कोहल प्यायले आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे इराण सरकारने मान्य केले आहे. इराणमधील मृतांची गणती करणाऱ्या कार्यालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, इंडिस्ट्रिअल अल्कोहल प्यायल्याच्या घटनेनंतर केवळ ७२८ लोकांचा मृत्यू झाला असे नाही, तर शेकडो लोक अंधही झाले आहेत. यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. अल जजीराने दिलेल्या एका वृत्तानुसार, विष प्यायल्याने मृत्यू झालेल्यांच्या यादीत यांचाही समावेश करण्यात आला आहे. तर हे सर्व लोक कोरोनावरील औषधांच्या अफवेमुळे बळी ठरले आहेत.

५ लोकांनी प्यायले मिथेनॉल

५ हजार लोक या अफवेमुळे इंडस्ट्रिअल अल्कोहल प्यायले. एवढेच नाहीतर त्यांना इंडस्ट्रिअल अल्कोहल मिळाले नसल्याने त्यांनी मिथेनॉलचे सेवन केले. तर अनेकांनी आपल्या मुलांनाही पाजले. त्यामुळे त्यातील अनेक जण अंध झाले असून त्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – इतिहासात प्रथमच भारत जगातील सर्वाधिक सैन्यदलावर खर्च करणारा देश


 

First Published on: April 28, 2020 8:25 PM
Exit mobile version