कराची विमान अपघातात बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी चमत्कारिकरीत्या बचावले

कराची विमान अपघातात बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी चमत्कारिकरीत्या बचावले

लाहोर ते कराची दरम्यान प्रवास करणाऱ्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअर लाईन्सचा भीषण अपघात झाला. कराचीच्या रहिवाशी भागात झालेल्या या भीषण अपघात विमानातील ९८ जणांनी आपले प्रमाण गमावले असताना बँक ऑफ पंजाबचे मुख्य कार्यकारी अधिकारी जफर मसूद हे चमत्कारिकरीत्या बचावले आहेत, असा दावा पाकिस्तानच्या जिओ न्यूजचॅनलने केला आहे. जफर हे केवळ किरकोळ जखमी झाले असल्याचं या माध्यमाने म्हटलं आहे.


हेही वाचा – पाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमानं लोकवस्तीत कोसळलं


तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या विमानात एकूण ९८ प्रवासी प्रवास करत होते. यात जफर मसूद यांचा देखील समावेश होता. या अपघातानंतर त्यांना दारुल सेहत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते आत आउट ऑफ डेंजर आहेत. सेहत रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जफर यांच्या हिप्स आणि कॉलरच्या हाडांना फ्रॅक्चर झालं आहे. तसंच त्यांनी त्यांच्या आईशी फोनवरून संवाद साधला असून आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे. सद्यस्थिती जफर यांचे भाऊ रुग्णालयात उपस्थित आहेत. जिओ न्यूजने केलेल्या दाव्यानुसार विमानाचा मागचा भाग आधी जमिनीवर आदळला. त्यामुळे जे कोणी पुढे बसलेले प्रवासी होते ते वाचले आहेत.

First Published on: May 22, 2020 8:53 PM
Exit mobile version