हत्येनंतर श्रद्धाचे कपडे येथे फेकले; आफताबने सांगितली जागा

हत्येनंतर श्रद्धाचे कपडे येथे फेकले; आफताबने सांगितली जागा

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : श्रद्धाची हत्या करण्यासाठी कोणती शस्त्रे वापरली व ती कुठे फेकली याची कबुली आरोपी आफताब पूनावालाने नार्को टेस्टमध्ये दिली. हत्येनंतर श्रद्धाचे कपडे कोठे फेकले याचीही माहिती आफताबने दिली. त्याआधारावर पोलीस पुढील तपास करतील.

पाॅलिग्राफ चाचणीनंतर आफताबची गुरुवारी नार्को टेस्ट करण्यात आली. नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येसंदर्भात अनेक गोष्टींची कबुली दिली. त्याआधारावर पोलीस घटनास्थळी जाऊन तपास करतील व पुरावे गोळा करतील. कारण आफताबने दिलेला कबुली जबाब न्यायालयात पुरावा म्हणून वारता येत नाही.

दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ पथकाकडून आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली.

पाॅलिग्राफ चाचणी व नार्को टेस्टमध्ये आफताबने प्रश्नांची उत्तरे देताना गुन्हाची कबुली दिली आहे. मात्र उतरांमध्ये तफावत असल्यास त्याच्याकडे याबाबत खुलासा मागितला जाईल, असे सुत्रांनी सांगितले. तब्बल दोन तास नार्को टेस्ट करण्यात आली. त्याआधी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

पाॅलिग्राफ चाचणीत श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली होती. श्रद्धाच्या शरीराचे अवयव जंगलात फेकले. तसेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे त्याने मान्य केले. श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हत्येचा कट आधीच रचल्याचे व त्याच उद्देशाने श्रद्धाला दिल्लीत आणल्याची कबुली आफताबने पाॅलिग्राफ चाचणीत दिली. श्रद्धाची हत्या केल्याचे घरच्यांना माहिती नव्हते, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. याप्रकरणी दिल्ली पाेलिसांनी आफताबला अटक केली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. पोलिसांनी आफताबला घटनास्थळी नेऊन पुरावे शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रकरणाचे ड्रग्ज कनेक्शन समाेर आले आहे. आफताब ड्रग्ज घ्यायचा. त्याला ड्रग्ज पुरवणारा आरोपी गुजरातमधील आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या हत्याकाडांच्या तपासाठी दिल्ली पोलीस वसईत आले होते. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे नातलग, मित्र-मैत्रिणी यांची चाैकशी केली. पाॅलिग्राफ चाचणी व नार्को टेस्टमध्ये आफताबने दिलेल्या कबुलीमुळे पोलिसांना पुरावे गोळा करण्यात मदत होणार आहे.

First Published on: December 1, 2022 4:23 PM
Exit mobile version