Covid-19 : भविष्यात मुलांमध्ये गंभीर संक्रमण होणार नाही – डॉ. रणदीप गुलेरिया

Covid-19 : भविष्यात मुलांमध्ये गंभीर संक्रमण होणार नाही – डॉ. रणदीप गुलेरिया

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केले असून आता देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही लहान मुलांना अधिक धोका असल्याचे अनेकदा बोलले गेले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. अशातच लहान मुलांना लवकरात लवकर लस देण्यात यावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले जात आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना लहान मुलांच्या कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे.

दरम्यान, जगासह देशातील बाधित रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यामध्ये लहान मुलांना कोणतेही संक्रमण झाल्याचे समोर आले नाही. मात्र काही लहान मुलांना फक्त सौम्य संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जर कोरोनाची तिसरी लाट आलीच तर लहान मुलांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होईल, असा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती यावर पत्रकार परिषद घेतांना सांगितले. यासह केंद्र सरकारने देशातील लहान मुलांच्या कोरोना संदर्भात महत्त्वाची माहिती देखील आहे, यावेळी केंद्राने असेही स्पष्ट केले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी कोरोना संक्रमित मुलं सापडली आहेत, त्यांना एकतर दुसरा दीर्घकालीन आजार आहे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. शिवाय मुलांना तिसऱ्या लाटेचा कोणताही धोका नाही. तसेच भविष्यात मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर संक्रमण होणार नाही, असे महत्त्वाचे विधानही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले.

यासह कोरोनाचा लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग झाल्याचा कोणताही भारतीय किंवा जागतिक डेटा नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या डेटानुसार ज्या कोरोना संक्रमित मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी ६० ते ७० % मुलांना दीर्घकालीन आजार आहे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याचे, डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. यासह आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी असे सांगितले की,  ७ मे रोजी देशात ४ लाख १४ हजार दररोज नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली होती, ती आता कमी होऊन १ लाखांपेक्षा खाली आली आहेत. तर देशात बरे होणाऱ्यांची संख्या वाढून रिकव्हरी रेट ९४.३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

First Published on: June 8, 2021 7:16 PM
Exit mobile version