Akash Primeची यशस्वी चाचणी; शत्रूच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम

Akash Primeची यशस्वी चाचणी; शत्रूच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम

Akash Primeची यशस्वी चाचणी; शत्रूच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम

आकाश मिसाईलचे अपडेटेड व्हर्जन ‘आकाश प्राईम’चे (Akash Prime) सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर जवळील एकात्मिक चाचणी रेंज (ITR) मधून यशस्वी चाचणी करण्यात आली. मिसाईलमध्ये सुधार झाल्यानंतर आपल्या पहिल्या उड्डाण चाचणीमध्ये शत्रूच्या विमानाची नक्कल करणारे मानवरहित हवाई लक्ष्यला रोखले आणि त्याला नष्ट केले. याबाबतची माहिती डीआरडीओने दिली आहे. आकाश प्राईमच्या चाचणीचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

भारतीय हवाई सेनेकडून या मिसाईलाचा वापर हवाई हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी केला जाईल. डीआरडीओने हे मिसाईल तयार केले आहे. ५६० सेंटीमीटर एवढी या मिसाईलची लांबी असून रुंदी ३५ सेमी आहे. तसेच या मिसाईलमध्ये ६० किलो वजनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. आकाश मिसाईल पूर्णपणे हाताळण्यायोग्य असून वाहनांच्या चालत्या ताफ्याचे संरक्षण करण्यास देखील सक्षण आहे.

या मिसाईलच्या लाँच प्लॅटफॉर्मला दोन्ही चाके आणि ट्रक वाहनांसह एकत्रित केले आहे. आकाश सिस्टमला हवाई संरक्षण म्हणून तयार केले गेले आहे. या मिसाईलची संरक्षण भूमिकेतही चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणे जोडली गेली आहेत. त्यामुळे हवाई हल्ल्याला सामोरे जाण्यास हे मिसाईल सक्षम असल्याचे म्हटले जात आहे.

यानिमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सेना, भारतीय हवाई दल आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांचे अभिनंदन केले आहे. आकाश प्राईममुळे देशातील सुरक्षा आणखीन वाढले असे राजनाथ सिंह म्हणाले.


हेही वाचा – दिल्लीच्या सर्व पर्यटनस्थळांची माहिती एका क्लिकवर; मुख्यमंत्री केजरीवालांनी लाँच केलं ॲप


 

First Published on: September 27, 2021 9:19 PM
Exit mobile version